नांदेड:(दि.२ जून २०२५)
श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ.एस.एस.बोडके आणि कनिष्ठ महाविद्यालयातील इंग्रजीचे प्रा.एस.एन. शेळके नियत वयोमानाप्रमाणे दि.३१ मे रोजी सेवानिवृत्त झाले आहेत.
माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांनी सेवानिवृत्तीचे पत्र देऊन पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी वनस्पतीशास्त्राचे नूतन विभागप्रमुख डॉ.एम.एम.व्ही.बेग, डॉ. सचिन पाटील, डॉ.रमेश चिल्लावार, डॉ. मनोज पैंजने, प्रबंधक संदीप पाटील, रोहित बोडके आदींची उपस्थिती होती.
डॉ.एस.एस.बोडके आणि प्रा.एस.एन.शेळके यांना सेवानिवृत्तीनिमित्त उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे, डॉ. हरिश्चंद्र पतंगे, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, डॉ.सविता वानखेडे, डॉ.संदीप खानसोळे, स्वामुक्टा प्राध्यापक संघटनेच्या यशवंत शाखेकडून डॉ. गौतम दुथडे, रसायनशास्त्र विभागातील सेवानिवृत्त डॉ.ए.टी. सूर्यवंशी, डॉ. परशुराम पवार, पालम, डॉ.एल. व्ही. पदमाराणी राव, डॉ.साहेब शिंदे, डॉ.अजय गव्हाणे, प्रा.ओमप्रकाश गुंजकर, डॉ.वीरभद्र स्वामी, डॉ.व्ही.सी. बोरकर, ग्रंथपाल डॉ.कैलास वडजे, डॉ.विश्वाधार देशमुख, डॉ. बालाजी भोसले, डॉ.विजय भोसले, डॉ.साईनाथ शाहू, डॉ.अजय टेंगसे, डॉ.रामराज गावंडे, डॉ.सुरेश तेलंग, डॉ.धनराज भुरे, डॉ. अजय मुठे, डॉ.संजय ननवरे, डॉ.संभाजी वर्ताळे, डॉ.एम.ए.बशीर,डॉ. संदीप पाईकराव, प्रा. नितीन नाईक, डॉ. शिवराज शिरसाठ, डॉ.शिवदास शिंदे, डॉ. दिगंबर भोसले, डॉ.शिवराज बोकडे आदींनी प्रत्यक्ष भेटून आणि समाज माध्यमावर हार्दिक शुभेच्छा दिल्या.
addComments
टिप्पणी पोस्ट करा