सानपाडा येथे सिताराम मास्तर उद्यानात १ जूनला ५० वाढदिवस साजरे*




पूर्वीच्या काळी आई-वडिल अशिक्षित असल्यामुळे  शाळेत प्रवेश घेण्यासाठी घेऊन गेल्यानंतर  गुरुजींनी नोंद केलेली जन्मतारीख म्हणजेच १  जून, या दिवशी येणारे वाढदिवस म्हणजे सरकारने नोंद केलेला जन्मदिवस,  हेच त्यांचे सरकारी तारखेचे  वाढदिवस. या तारखेनुसार अनेक जणांना सरकारी नोकऱ्या मिळाल्या व त्याच तारखेनुसार अनेक जण सेवानिवृत्त झाले. त्यामुळे हीच त्यांची खरी जन्मतारीख आहे. या दिवशी भारतात अनेकांचे वाढदिवस साजरे केले जातात. अशाच पैकी नवी मुंबईत  सानपाडा येथे कै. सिताराम मास्तर उद्यानात  १ जूनला गार्डन ग्रुप ७.५०  चे २७,  गार्डन ग्रुप ७.०५ चे १४  आणि  हास्य क्लब  योगा ग्रुप  ६.३०  चे ९  असे  एकूण  ५० व्यक्तींचे  वाढदिवस साजरे करण्यात आले. याप्रसंगी सानपाडा विभागातील नगरसेवक आणि शिवसेना शिंदे गटाचे  सोमनाथ वास्कर,  भारतीय जनता पार्टीचे समाजसेवक भाऊ भापकर,  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपविभाग प्रमुख अजय पवार, पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाचे  कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मारुती कदम, समाजसेवक रणवीर पाटील,  सदाशिव तावडे, राजूशेठ  सैद, गणपत वाफारे,  इत्यादी मान्यवरांनी वाढदिवसानिमित्त  सर्वांना शुभेच्छा दिल्या.

आपला 

मारुती विश्वासराव

टिप्पण्या