मुंबई मराठी पत्रकार संघाचा २१ जून २०२५ रोजी संघाच्या सभागृहात मोठ्या उत्साहात ८४ वा वर्धापन दिन संपन्न झाला. या कार्यक्रमात इंडिया टुडे वाहिनीचे सल्लागार संपादक राजदीप सरदेसाई यांच्या हस्ते संघाचे विविध पुरस्कार प्रदान आणि सन्माननीय सदस्यत्व बहाल करण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे प्रसिद्धीप्रमुख आणि पोर्ट ट्रस्ट कामगार दिवाळी अंकाचे कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव, महाराष्ट्र शासनाच्या जनसंपर्क व माहिती विभागाचे सेवानिवृत्त संचालक देवेंद्र भुजबळ, ज्येष्ठ पत्रकार मंगेश विश्वासराव, सुनील शिंदे, दिलीप ठाकूर, संजय डहाळे, नवनाथ दांडेकर इत्यादी मान्यवर ज्येष्ठ पत्रकारांना ६५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल इंडिया टुडे वहिनीचे सल्लागार संपादक राजदीप सरदेसाई यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सन्माननीय सदस्यत्व बहाल करण्यात आले.
याप्रसंगी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी प्रास्ताविक भाषणात संघाची यशस्वी वाटचाल सांगून आगामी अनेक उपक्रमाची माहिती दिली.
ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी आपल्या मार्गदर्शनपर मार्ग सांगितले की, या कार्यक्रमाने मी भारावून गेलो आहे. महाराष्ट्रातील गौरवशाली पत्रकारिता ही देशाला नेहमीच मार्गदर्शक ठरली आहे. आजच्या बदलत्या पत्रकारितेबाबत त्यांनी चिंता व्यक्त करून बीड येथील जिल्हास्तरीय पत्रकारांनी निर्भयपणे काम केले त्याचे कौतुक केले. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कुलकर्णी व विद्यादर दाते
यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संघाचे प्रमुख कार्यवाह शैलेंद्र शिर्के यांनी सर्वांचे स्वागत करून स्वागतपर भाषण केले.
वर्धापन दिनाच्या या कार्यक्रमा प्रसंगी शोध पत्रकारितेचा यमुनाताई खाडीलकर पुरस्कार सुरज सावंत व काशिनाथ म्हादे, मुद्रित शोधकाचा भालचंद्र खांडेकर पुरस्कार शिवराम मांजरेकर, पत्रकार क्षेत्रातील प्रदीर्घ कार्याबद्दलचा अनंत हरी गद्रे पुरस्कार प्रकाश कुलकर्णी, तोलाराम कुकरेजा वृत्तपत्र छायाचित्र पुरस्कार प्रदीप धिवार, आणि ज्येष्ठ पत्रकार व संपादकास दिला जाणारा मधुसुदन सिताराम रावकर स्मृति पुरस्कार विद्याधर दाते यांना इंडिया टुडे वाहिनीचे सल्लागार संपादक राजदीप सरदेसाई यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व रोख दहा हजार रुपये असे सन्मानाचे स्वरूप होते. कार्यक्रमास राजेंद्र हुंजे, स्वाती घोसाळकर, जगदीश भोवड, देवदास मटाले, वैजयंती कुलकर्णी, राई भिडे, प्रसाद मोकाशी, प्रकाश अकोलकर, कुमार कदम, अजय वैद्य, अनिल गणाचार्य, भाऊ सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
आपला
मारुती विश्वासराव
addComments
टिप्पणी पोस्ट करा