मावळ येथे शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या वाटप करून वाढदिवस साजरा*



लोणावळ्या जवळील मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाथरगाव, या ठिकाणी शाळेतील मुलांना वह्यांचे वाटप करून, वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा करून समाजामध्ये, सामाजिक बांधिलकीचा, आगळावेगळा संदेश  दुराफे कुटुंबियांनी दिला. या कार्यक्रमाला नेव्ही रिटायर्ड ऑफिसर श्रीकांत पटवर्धन व शलाका पटवर्धन, तसेच  सागर पटवर्धन, सारिका दुराफे ,गावातील माजी सरपंच, व सध्याची शाळा व्यवस्थापक  प्रकाश काशिनाथ केदारी, विकास केदारी, अमोल केदारी, शिक्षण समिती अध्यक्ष  शाहीदास केदारी, बबन शंकर केदारी, आणि भामाताई बालगुडे उपस्थित होत्या. गोदरेज कंपनीतील मीतेश दुराफे. यांनी आयुष्यात शिक्षणाचे महत्त्व खूप आहे. शिक्षण माणसाला सुसंस्कृत आणि स्वावलंबी करते  यावरती भाष्य करून मुलांना शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले.  मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनच्या कार्यकर्त्या योगिनी दुराफे  यांनी उत्तीर्ण झालेल्या सगळया मुलांना पुढील वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. ज्या समाजामध्ये आपण मान ,सन्मान, प्रतिष्ठा, स्वास्थ्य, प्रामाणिकपणे पैसे. मिळवून आपले कुटुंब आणि आपण स्थिरावतो. त्या समाजाचे आपण देणेही लागतो. या भावनेपोटी हा छोटेखानी कार्यक्रम आयोजित केला आहे ,असे विचार व्यक्त केले. न्यूसी चे  प्रशासकीय अधिकारी शशामकांत दुराफे यांनी शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. या शब्दात शिक्षणाचे महत्त्व मुलांना पटवून दिले . आभार प्रदर्शन शरद शेळकंदे , आणि मुख्याध्यापक अंकुश गाऊसे  यांनी केले.

आपला 

मारुती विश्वासराव

टिप्पण्या