नवी मुंबई येथील सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष, हरियाली व मानव सेवा संस्थेचे संस्थापक, पर्यावरण प्रेमी, सर्व राजकीय नेत्यांशी चांगले संबंध संबंध ठेवून विकासाची कामे करणारे, झाडे लावा झाडे जगवा हे प्रत्यक्षात कृतीत आणणारे निसर्गप्रेमी, निस्वार्थी व प्रामाणिकपणे गोरगरीब आणि सानपाडा ज्येष्ठ नागरिकांची सेवा करणारे समाजसेवक श्री. मारुती कदम यांच्या ७६ व्या वाढदिवसा निमित्त सिताराम मास्तर उद्यानातील ज्येष्ठ नागरिक, ७.५०, ७.०५, व ६.३० या गार्डन ग्रुपच्या वतीने पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. मारुती कदम यांच्या सामाजिक कार्यावर आधारित सानपाड्यातील माजी नगरसेवक सोमनाथ वासकर, समाजसेवक भाऊ भापकर , शिवसेना उबाठा गटाचे अजय पवार, दत्तात्रय कुरळे, शिवसेना शिंदे गटाचे अजित सावंत, रामचंद्र पाटील, पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाचे कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव, समाजसेवक रणवीर पाटील, सदाशिव तावडे, वाफारे आदी मान्यवरांनी शुभेच्छा देऊन, मारुती कदम यांना निरोगीमय दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्याहातून अखंडपणे समाजकार्य होत राहो, अशा सदिच्छा दिल्या.
आपला
मारुती विश्वासराव.
addComments
टिप्पणी पोस्ट करा