वर्धा येथे २६ वी राज्य मिनी / युथ टेनिस व्हालीबॉल क्रीडा स्पर्धेचे थाटात आयोजन*. *वर्धा, यवतमाळ, पुणे, ठाणे, बीड विजेता*

*


परभणी (.               )टेनिस व्हालीबॉल महाराष्ट्र असोसिएशन च्या मान्यतेने तसेच अवधेश क्रिडा मंडळ वर्धा व वर्धा जिल्हा टेनिस व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा दि. २२ व २३ एप्रिल २०२५ या दरम्यान घेण्यात आल्या. या स्पर्धेला महाराष्ट्रातून मिनी व युथ गटांमध्ये १५ जिल्हयांचा समावेश होता. दि.२२ एप्रिल रोजी उद्घाटन समारंभात अध्यक्षस्थानी राज्य अध्यक्ष सुरेश रेड्डी क्यातमवार, डॉ. व्यकटेश वांगवाड टेनिस व्हालीबॉल खेळाचे जनक, गणेश माळवे राज्य सचिव, रामेश्वर कोरडे राज्य उपाध्यक्ष, संजय ठाकरे, सतिश नावाडे, अशोक शिंदे, तेजस पाटील डॉ. विनय  मुन सचिव वर्धा जिल्हा टेनिस व्हालीबॉल असोसिएशन यांची उपस्थिती होते . उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी  राज्य अध्यक्ष सुरेश रेड्डी क्यातमवार म्हणाले की भारतीय टेनिस व्हॉलीबॉल खेळांचा प्रसार विदर्भात जोमाने झाला पाहिजे. भारतीय खेळाला जागतिक पातळीवर आणण्यासाठी सर्वांनी प्रत्यणशिल असांव. यांनी सर्व संघांना शुभेच्छा दिल्या व मोलाचे मार्गदर्शन केले.

डॉ.व्यंकटेश वांगवाड म्हणाले लवकर आशिया क्रीडा स्पर्धा आयोजन भारतात करण्यात येईल.

 गणेश माळवे राज्य सचिव यांनी यांच्या संभाषणात सांगीतले की ओडीसा येथे होणऱ्या १ ते ४ मे २०२५ या दरम्याण राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. या राज्य स्तरीय स्पर्धे तुन राष्ट्रीय संघाची निवड केल्या जाईल. सर्व स्पर्धेला आलेल्या खेळाडुनी उत्कृष्ठ खेळाने प्रदर्शन करावे.

 युथ मुले अंतिम निकाल:-

यवतमाळ :-प्रथम 

मुबई शहर : व्दितीय 

 नाशिक:- तृतीय 

युथ मुली अंतिम निकाल:-

वर्धा : प्रथम

 ठाणे : व्दितीय 

 मुंबई उपनगर:-तृतीय 

युथ मिश्र दुहेरीत गटात : ठाणे:प्रथम,  नवी मुंबई :- व्दितीय , परभणी :-तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरलेला आहे. 

मिनी मुले संघ :

पूणे :- प्रथम,  ठाणे: व्दितीय 

परभणी:- तृतीय.  या सघाने पटकावले आहे. 

मिनी मुली संघात :- बीड : प्रथम , नाशिक :- व्दितीय , हिंगोली:-तृतीय  या सघाने पटकावले आहे.

 मिनी मिश्र दुहेरी: मिक्स इवेंट पूणे:- प्रथम , नाशिक : व्दितीय , नवी मुंबई :-तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरलेला आहे. विजयी संघास  पुष्प गुच्छ व ट्रॉफी देउन सन्मानित करण्यात आले. 

स्पर्धा यशस्वीतेसाठी अवधेश क्रीडा मंडळ सचिव विनय  मुन, उपसचिव दिवाकरराव  मुन, कोषाध्यक्ष सुनीलजी ढाले, अविंक  मुन, गौरव चैनानी, रोमदेव बालपांडे दर्शन हस्ती, सोनाली भारोटे, विभा मेश्राम, ओम मुळे, सौरभ कोसुलकर, ओम धामंदे, अनिकेत कांबळे, अनिकेत काळे, वैभव साठे, प्रविन शेंडे, फाल्गुन लोहकरे, यांनी परीश्रम घेतले.

टिप्पण्या