राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत सरस्वती विद्यालयाचा राघव राजेश लोंढे प्रथम.*


 *गंगाखेड (प्रतिनिधी)*                 ध्येयप्रकाशन पाचगणी आयोजित *आय एम द विनर* ही राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा दिनांक 12 जानेवारी रोजी महाराष्ट्रातील विविध केंद्रावर संपन्न झाली.  त्यामध्ये सरस्वती विद्यालयाचा इयत्ता सातवीचा विद्यार्थी राघव राजेश लोंढे याने परभणी जिल्ह्यातुन सर्वप्रथम येण्याचा मान मिळवला आहे. त्याच्या या यशाबद्दल सरस्वती विद्यालय परिवारातर्फे त्याचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक लक्ष्मण मादरपल्ले, परीक्षा विभाग प्रमुख गोपाळ मंत्री, पालक राजेश लोंढे सह इतर सर्व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या