पुणे जिल्ह्यामधील जुन्नर तालुक्यातील धोलवड या गावचे सुपुत्र आणि सानपाडा सेक्टर ३ च्या वृंदावन सोसायटीतील रहिवासी लक्ष्मण नलावडे यांना नुकताच त्यांच्या गावी संकल्प सेवा प्रतिष्ठानच्या वतीने " शिवनेरीची श्रीमंती " या लोकप्रिय पुस्तकाचे लेखक व स्तंभलेखक संजय नलावडे यांच्या हस्ते" समाजभूषण " पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी, अनेक संस्था, अनेकांचे संसार, गोरगरिबांना मदत, शालेय विद्यार्थ्यांना स्वखर्चाने वह्या पुस्तके देऊन त्यांची फी सुद्धा स्वतः भरून अनेक विद्यार्थी त्यांनी घडवले. सानपाडा सेक्टर २ येथील वात्सल्य ट्रस्टचे संस्थापक, वात्सल्य ट्रस्टचे सानपाडा केंद्र प्रमुख म्हणून २४ वर्ष त्यांनी वात्सल्य ट्रस्ट मधील अनाथ मुले - मुली, वयोवृद्ध यांची
सेवा केली. भारतीय रिझर्व्ह बँकेत त्यांनी ३७ वर्ष अधिकारी म्हणून काम पाहिले. सानपाडा येथील मराठा विकास प्रतिष्ठान व ज्येष्ठ नागरिक संघाचे ते संस्थापक असून आजही मधून मधून कार्यालयात ते भेट देतात. सध्या ते सेवानिवृत्त आहेत. नलावडे काकांना लोक भेटले की, एक नवीन ऊर्जा, प्रेरणा मिळत असते. असंख्य तरुणांना जे राजकारण आणि समाजकारण या क्षेत्रात काम करत आहेत त्यांना नलावडे काकांचे विशेष मार्गदर्शन मोलाचे आणि दिशा दर्शक ठरत असते. लक्ष्मण नलावडे या निस्वार्थी समाजसेवकास मिळालेला समाजभूषण पुरस्काराबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन.
आपला
मारुती विश्वासराव
addComments
टिप्पणी पोस्ट करा