नेरली येथे समाजोपयोगी उपक्रम राबवून महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

नांदेड:(दि.३० एप्रिल २०२५)

               दि.२९ एप्रिल रोजी नेरली ता. जि. नांदेड येथे ग्रामवासियांच्या वतीने भारतीय संविधानाचे निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. 

             सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्प व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. नेरलीच्या सरपंच दैवशाला कोकरे यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करण्यात आले आणि सामुदायिक पंचशील त्रिशरण ग्रहण करण्यात आले.

                या निमित्ताने डॉक्टर लेन, नांदेड येथे रुग्णांच्या सेवेत नव्यानेच सुरू झालेल्या निलावती आय हॉस्पिटल (फेको सर्जरी सेंटर)च्या वतीने मोफत नेत्र तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हॉस्पिटलच्या संचालिका डॉ.पौर्णिमा सावळे व त्यांच्या चमूने रुग्णांच्या डोळ्यांची तपासणी करून आवश्यक औषधी देवून उपचार केले. 

                शिबिराचे उद्घाटन यशवंत महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ.गौतम दुथडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी नारायणराव येवले, चंद्रकांत ढगे व उत्तम सावळे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

                शिबिरात मोठ्या संख्येने गरजूंनी नेत्र तपासणी व उपचाराचा लाभ घेतला. या वेळी गुरु ऑप्टिकल्सचे बंडू मद्देवाड व त्यांचा स्टाफ यांचेही सहकार्य लाभले. सायंकाळी गावातील मुख्य रस्त्यांनी तथागत गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची शांततेत मिरवणूक काढण्यात आली. 

                सकाळच्या सत्रात उपस्थित मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या  जीवन कार्यावर आपले विचार मांडले. 

             जयंती सोहळा यशस्वी करण्यासाठी नवयुवक भीमजयंती मंडळाचे अध्यक्ष मारोती नरवाडे, सुभाष नरवाडे, माधव नरवाडे, बबलू जोंधळे, शिवानंद नरवाडे, सुरेश नरवाडे, प्रशीक नरवाडे, मुंजाजी नरवाडे, रुखमाजी कोकरे, संदीप सातोरे, प्रभाकर नरवाडे, गौतम सातोरे, गंगाधर नरवाडे, सुभाष नरवाडे, नाथा नरवाडे आदींनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या