महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेच्या निर्भया समितीतर्फे स्वारगेट बस स्थानक येथे घडलेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी १ मार्च २०२५ रोजी निषेध बैठकीच्या आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्वारगेट येथे महिला प्रवासी सोबत झालेल्या निंदनीय घटनेचा निषेध करण्यात आला. तसेच यावेळी माननीय परिवहनमंत्री यांनी तात्काळ बैठक घेऊन महिला प्रवाशांच्या सुरक्षेबाबत घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. परंतु महिला प्रवाशांच्या सुरक्षेसोबतच राज्य परिवहन महामंडळातील महिला चालक वाहक यांच्या सुरक्षेची आग्रही मागणी यावेळी मा. परिवहन मंत्री यांना निवेदनद्वारे करण्यात आली. तसेच मा. राज्य परिवहन मंत्री ना. माधुरीताई मिसाळ यांना भेटून निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात काम करणाऱ्या अनेक महिला भारत आणि महिला चालक यांना अनेक आगारांमध्ये रात्री उशिरा संपणाऱ्या ड्युटीसाठी पाठवले जाते. तसेच त्यांना काही आगारात राहत वस्तीसाठी पण पाठवले जाते. तसेच त्यांना दिलेल्या स्वच्छतागृह विश्रांती ग्रहात अनेक गैरसोयी असतात व सुरक्षेचा अभाव असतो त्यामुळे या महिलांच्या सुरक्षेबाबत कुठलीही दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे त्यांना पण सुरक्षा द्या अशी मागणी माननीय राज्य परिवहन मंत्री माधुरीताई मिसाळ यांच्याकडे राज्य महिला संघटक शीला नाईकवाडे यांनी केली तसेच स्वारगेट मधील कामगारांच्या रिकाम्या करण्यात आलेल्या कॉटर्सच्या ठिकाणी पण काही अशीच दुर्घटना होऊ शकते, याकडे पुणे विभागीय सचिव दिलीप परब यांनी निवेदनाद्वारे लक्ष वेधले. या निषेध बैठकीला व निवेदन भेटीला महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे पुणे विभागाचे विभागीय कार्यालय सचिव सागर दिघे, अध्यक्ष दीपक सावंत. स्वारगेट सचिव विशाल रेपळे व निर्भया प्रमुख अश्विनी चिंचोरे, सूर्यवंशीताई,अर्चना वासनकर यांच्यासह संघटनेचे सदस्य वं निर्भया मोठ्या प्रमाणावर हजर होते.
आपला
मारुती विश्वासराव

addComments
टिप्पणी पोस्ट करा