छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित व त्यांची शौर्यगाथा सांगणारा " छावा " चित्रपट नवी मुंबई सानपाडा येथील कै. सिताराम मास्तर उद्यानातील गार्डन ग्रुप ७:५० च्या समूहाने ३ मार्च २०२५ रोजी सानपाड्यामधील चित्रपटगृहात एकजुटीने पाहिला. गार्डनमध्ये दररोज सकाळी बरोबर ७.५० ला केंद्र सरकार, राज्य सरकार, पोलीस दल, रेल्वे, पोस्ट, पोर्ट, विमा, बँक, ट्रान्सपोर्ट, खाजगी कंपन्या इत्यादी विविध उद्योग क्षेत्रात सेवेत असणारे व सेवानिवृत्त झालेले कामगार कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी दररोज योगा व व्यायाम करण्यासाठी एकत्र येतात. सानपाडा येथील जवळजवळ सर्वच हौसिंग सोसाट्यातील पदाधिकारी व सभासदांचा या गार्डन ग्रुपमध्ये समावेश आहे. या ग्रुपचे सहकारी सभासद श्री. सत्यनारायण महापूजा, लग्न विवाह सोहळे, हॉस्पिटल ऍडमिशन, शाळेचे ऍडमिशन, गरजू विद्यार्थ्यांना मदत, अत्यावश्यक सुख सुविधांचा पाठपुरावा, अंत्यविधी यासारख्या सुखदुःखाच्या प्रसंगी सहभागी होतात. त्याचप्रमाणे या ग्रुपमध्ये सभासदांचे वाढदिवस साजरे केले जातात. राजकीय नेत्यांच्या सहकार्याने किंवा सभासद वर्गणीतून कर्जत, अलिबाग इत्यादी विविध ठिकाणी पिकनिक काढल्या जातात. या पिकनिकमध्ये माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांचे विशेष आर्थिक सहाय्य मिळते. सानपाडा गार्डनमध्ये नावाजलेल्या या ७.५० च्या ग्रुपने एकजुटीने सध्या नावाजलेला छावा चित्रपट पाहिला.
याप्रसंगी माजी नगरसेवक व उबाठाचे नवी मुंबई महानगरप्रमुख सोमनाथ वास्कर, विभाग प्रमुख अजय पवार, शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख अजित सावंत, पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाचे कार्यकारी
संपादक मारुती विश्वासराव, गार्डन ग्रुपचे अध्यक्ष सदाशिव तावडे, खजिनदार रणवीर पाटील, तेजाभाई वाढेल, कैलास कणसे, श्रीकांत पाटील असे चित्रपट पाहण्यासाठी एकूण ६० सभासद सहभागी झाले होते.
आपला
मारुती विश्वासराव

addComments
टिप्पणी पोस्ट करा