मुंबई पोर्ट प्राधिकरणामध्ये १ मार्च २०२५ रोजी नागरी सुरक्षा दिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला. नागरी सुरक्षा संघटनाच्या माध्यमातून ,१ मार्च रोजी, आंतरराष्ट्रीय नागरी सुरक्षा संरक्षण दिन सकाळी ९ ते ११ या दरम्यान डॉकयार्ड रोड येथील निर्माण भवन सिव्हिल डिफेन्स कंट्रोल ऑफिस येथे शिस्तबद्ध पद्धतीत साजरा. डेपो. डिव्हि.वॉर्डन कमांडर योगिनी दुराफे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुंदर केले. डेपो.डिव्हि.वॉर्डन माजी कमांडर गणेश म्हशीलकर यांनी सांगितले की, सिविल डिफेन्स प्लाटून कमांडर हे निस्वार्थीपनाने, सेवा देणारे असावेत. एखादी आपत्कालीन घटना घडली तर स्वतःचा वेळ देऊन प्रथम स्वतःचा जीव वाचवून इतरांना तत्परतेने योग्य मदत करता आली पाहिजे. इतरांचे जीव कसे वाचवता आले पाहिजे. या विषयी मार्गदर्शन त्यांनी केले. डेपो. डिव्हि. वॉर्डन माजी.कमांडर गोविंद कदम यांनी सिव्हिल डिफेन्स जवानांना, सिव्हिल डिफेन्सचा जागतिक इतिहास थोडक्यात सांगितला. सकाळी ध्वजारोहण करण्यात आले. कंट्रोलर अधिकारी चंद्रकांत निर्मल यांनी ध्वजाला मानवंदना दिली. आणि जागतिक नागरी संरक्षण दिनाच्या निमित्तानं मनोगत व्यक्त करून सर्व जवानांना हार्दिक शुभेच्छा दिल्या .
सिव्हिल डिफेन्स म्हणजे काय आहे. त्याचे महत्व ,आणि नागरिकांचा सहभाग कसा असावा यावर त्यांनी मार्गदर्शन केले.
आपला
मारुती विश्वासराव

addComments
टिप्पणी पोस्ट करा