*सानपाड्यातील समाजसेवक शंकर माटे यांचा ८० वा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न*


नवी मुंबई सानपाडा येथील लोकप्रिय समाजसेवक शंकर माटे उर्फ बापू यांचा  ८० वा अभिष्टचिंतन सोहळा १ मार्च  २०२५ रोजी सानपाडा येथील नवीन मार्केट जवळ संपन्न झाला. महाराष्ट्रातील भटक्या विमुक्त  जाती जमातीचे  आधारवड, सानपाडा वाशियांचे राजकीय मार्गदर्शक व  कार्यसम्राट माजी नगरसेवक शंकर माटे यांचा ८० व्या वाढदिवसानिमित्त सानपाड्यामधील विविध राजकीय व सामाजिक संस्थांच्या नेत्यांनी  पुष्पगुच्छ देऊन  सन्मान केला. महाराष्ट्रातील भटक्या विमुक्त जाती  जमाती हक्क परिषदेचे ते एक मार्गदर्शक आहेत.  इंग्रजांनी १८७१ साली ५२   जाती जमातीच्या  लोकांना सोलापूर येथे ४५०  एकरमध्ये एकाच ठिकाणी कुंपण घालून डांबून ठेवले होते. त्याच ठिकाणी त्यांचा उदरनिर्वाह होत होता.  उरलेली ९० एकर जागा खाली होती, अनेक वर्षाच्या संघर्षानंतर ही जागा आता  भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना मिळाली आहे. त्यामध्ये जवळजवळ एक लाख घरांचे स्वप्न पूर्ण होईल. 

ज्यांना घर नाही,  जे घरापासून वंचित आहेत,  अशा लोकांना या ठिकाणी घरे मिळतील. या  घरांच्या स्वप्नाचे आधारवड खऱ्या अर्थाने शंकर माटे आहेत. समाजात कार्य कसं करावं,  हे बापूकडून शिकावं. भाजीपाल्याचा व्यवसाय ते नवी मुंबई नगरीच्या नगरसेवकापर्यंत त्यांचा जीवनप्रवास अत्यंत कठीण परिस्थितीत गेला.  स्वतःच्या हितापेक्षा त्यांनी नेहमीच समाजाचे हित पाहिलं. सानपाड्यांमध्ये देखील अनेक विकासाची कामे समाजसेवक शंकर माटे यांनी केली आहेत. हे सानपाडावासिय कधीही विसरणार नाहीत.

अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी माजी नगरसेवक सोमनाथ वास्कर, सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मारुती कदम, सुभाष बारवाल, भटक्या विमुक्त जाती जमाती हक्क परिषदेचे पदाधिकारी, शिवसेना शिंदे गटाचे अजित सावंत,  भटक्या विमुक्त हक्क परिषदेचे बिरवटकर आदी मान्यवरांनी वाढदिवसाच्या निमित्ताने शंकर माटे यांना त्यांच्या सामाजिक कार्यावर आधारित शुभेच्छा दिल्या. या सोहळ्याला उबाठाचे विभाग प्रमुख अजय पवार,  शिवसेना शिंदे गटाचे मिलिंद सूर्याराव,  अविनाश जाधव,  भाजपाचे गणेश कमळे,  पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाचे  कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव,  ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष विठ्ठल गव्हाणे, डॉ.  विजया गोसावी,  खजिनदार विष्णुदास मुखेकर, बळवंतराव पाटील,  भानुमती शहा,  मराठा विकास प्रतिष्ठानचे सहसचिव ज्ञानेश्वर जाधव, पांडुरंग वाजे,   गार्डन ग्रुप ७.५०  चे रणवीर पाटील, तेजाभाई वाडेल, मारुती शिंदे, राजेंद्र लांडगे, शिरवळकर, भंडारी,  राजू सैद, गणेश हुले, आदी मान्यवर उपस्थित होते.  सुरुवातीला शंकर माटे यांची कुटुंबातर्फे नातेवाईक महिलांनी ८० दीप लावून ओवाळणी केली. स्नेहभोजनानी कार्यक्रमाची सांगता झाली

आपला 

मारुती विश्वासराव

टिप्पण्या