गंगाखेड (प्रतिनिधी)
येथील श्री संत जनाबाई शिक्षण संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात दि.28 फेब्रुवारी रोजी “रिसेंट ॲडव्हान्सेस इन लाईफ सायन्सेस फॉर सस्टेनेबल एग्रीकल्चर” या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी गुलबर्गा विद्यापीठ, कलबुर्गी (कर्नाटक) येथील माजी कुलगुरू प्रोफेसर डॉ. दयानंद अग्सर हे उदघाटक व प्रमुख पाहूणे म्हणुन उपस्थित होते.
प्रोफेसर डॉ. दयानंद अग्सर यांनी त्यांच्या व्याख्यानात शाश्वत शेतीसाठी सुक्ष्मजीव कसे उपयुक्त ठरू शकतात व सुक्ष्मजीवाणुंमुळे मातीची उत्पादन क्षमता वाढते व जमिनीची नैसर्गिक पोत/ उत्पादन क्षमता कायम राहते, यावर व्याख्यान दिले व सुक्ष्मजिवाणु हा शाष्वत शेतीसाठी एकमेव पर्याय असल्याचे नमूद केले.
ही राष्ट्रीय परिषद श्री संत जनाबाई महाविद्यालयाला पीएम-उषा अंतर्गत मिळालेल्या आर्थिक मदतीचा एक भाग होती. या राष्ट्रीय परिषदेसाठी देशभरातील विविध विद्यापीठातील शास्त्रज्ञ, विषय तज्ञ, साधन व्यकती म्हणून उपस्थित होते. या परिषदेसाठी पंजाबी विद्यापीठ, पटियाला (पंजाब) येथील वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मनिष कुमार, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ.अरविंद धाबे, ॲन्टी कॅन्सर ड्रग स्क्रीनींग फॅसिलीटी, टाटा मेमोरीयल सेंटर, खारघर नवि मुंबई येथील सायंटिफिक ऑफिसर ‘डी’ डॉ. के निर्मलकुमार तसेच श्री क्रष्णदेवराया विद्यापीठ, अनंथपुरम (आंध्रप्रदेश) या विद्यापीठातील रेशिमउद्योग विभागाचे समन्वयक डॉ. बी.सत्यनारायणा यांनी मार्गदर्शन केले. या राष्ट्रीय परिषदेच्या व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून श्री संत जनाबाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष: प्राचार्य डॉ. आत्मारामजी टेंगसे, सचिव: ॲड. संतोषरावजी मुंढे, संचालक डॉ. दिनानाथ फुलवाडकर, स्वा.रा.ती.म.विद्यापीठ उपकेंद्र परभणी येथील संचालक डॉ.पी.एस.वक्ते, शिवाजी महाविद्यालय रेणापूरचे प्राचार्य डॉ.आवस्थी, प्रतिष्ठित कवि डॉ. इंद्रजीत भालेराव आदि मान्यवर उपस्थित होते.
ही राष्ट्रीय परिषद यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.एम. धुत, राष्ट्रीय परिषदेचे आयोजक डॉ.रामविलास जी. लडडा, राष्ट्रीय परिषदेचे संयोजक तथा अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ संजीवकुमार व्ही. क्षिरसागर, उपप्राचार्य डॉ.दयानंद जी उजळंबे, उपप्राचार्य डॉ.चंद्रकात बी.सातपुते, कार्यालयीन अधिक्षक भारत हत्तीअंबीरे, श्रीनिवास खळीकर, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.संतोष आर.गायकवाड तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. सदरिल कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. सचिन कलमे, प्रा. कैलास गीरी व प्रा अमोल करपे यांनी केले.
या राष्ट्रीय परिषदेला महाराष्ट्रातील व देशभरातील विविध विद्यापीठातून एकूण 398 प्राध्यापकांनी नोंदणी केली होती व बहुसंख्येने उपस्थित होते.

addComments
टिप्पणी पोस्ट करा