नांदेड(दि.२८ मार्च २०२५)__:
यशवंत महाविद्यालयात इतिहास विभागाच्या वतीने ‘भारतीय पुरातत्त्व आणि पर्यटन’ या विषयावर पंतप्रधान उच्चस्तर शिक्षाअभियान अंतर्गत अँड ऑन कोर्सचे आयोजन करण्यात आले होते. हा कोर्स पीएम:उषा सॉफ्ट कंपोनेट ऍक्टिव्हिटी – २०२५ योजनेअंतर्गत घेण्यात आला.
इतिहास विषयाच्या पदवी व पदव्युत्तर वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या कोर्समध्ये विविध मान्यवर बहिस्थ प्राध्यापकांनी मार्गदर्शन केले.
कोर्सच्या उद्घाटनप्रसंगी माजी प्र -कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते, तर प्रमुख मार्गदर्शक कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील डॉ. पी. डी. जगताप होते.
या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना पुरातत्त्व आणि पर्यटन यांचे मूलभूत तत्त्व समजावून देण्यात आले. कोर्सअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी विशेष व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख वक्त्यांमध्ये डॉ. अविनाश कदम (भूगर्भशास्त्र विभाग, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड), डॉ. अरविंद सोनटक्के (इतिहास विभागप्रमुख, दिगंबरराव बिंदू कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, भोकर), डॉ. ओम शिवा लिगाडे (इतिहास विभागप्रमुख, शिवजागृती वरिष्ठ महाविद्यालय, नळेगाव), डॉ. कामाजी डक (पुरातत्त्वज्ञ, नांदेड) यांचा समावेश होता तसेच इतिहास विभागप्रमुख डॉ. शिवराज बोकडे, डॉ. संगीता शिंदे(ढेंगळे), डॉ. साईनाथ बिंदगे,प्रा. राजश्री भोपाळे यांनीही मार्गदर्शन केले. शेवटी दोन क्रेडिटच्या कोर्सअंतर्गत विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली.
अभ्यासक्रमाच्या पूर्ततेनंतर नांदेड येथील ऐतिहासिक नंदगिरी किल्ला व सचखंड श्री. हजुर साहिब गुरुद्वारा येथे अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आले. या कोर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मराठवाड्यातील पुरातत्त्वीय पर्यटन स्थळांची माहिती मिळाली तसेच पर्यटन व पुरातत्त्व यांचे मूलतत्वे जाणून घेण्याची संधी प्राप्त झाली.
या उपक्रमांचे समन्वयक डॉ. शिवराज बोकडे आहेत. सर्व उपक्रमांकरीता डॉ संगिता शिंदे(ढेंगळे) ,डॉ.साईनाथ बिंदगे, प्रा.राजश्री भोपाळे यांनी परिश्रम घेतले. या कोर्सला विद्यार्थी व प्राध्यापकांचा मोठा प्रतिसाद लाभला.
या उपक्रमांसाठी उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे, डॉ.हरिश्चंद्र पतंगे, प्रसिद्धी समन्वयक डॉ.अजय गव्हाणे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिराजदार व गजानन पाटील आदींनी सहकार्य केले.

addComments
टिप्पणी पोस्ट करा