जागरूक ग्राहक काळाची गरज*-- *गोपाळ मंत्री*



*गंगाखेड( प्रतिनिधी).*  

  सध्याच्या काळामध्ये ग्राहकांनी जागरूक राहणे अत्यंत गरजेचे आहे  ,कारण वेगवेगळ्या प्रकारे ग्राहकांची फसवणूक करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत यामध्ये विशेषतः सायबर गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले आहे, तेव्हा कसल्याही प्रकारच्या लोभाला आणि   फसव्या जाहिरातींना बळी न पडता अत्यंत डोळसपणे ग्राहकांनी खरेदी करावी  जेणेकरून फसवणूक होणार नाही व या उपर फसवणूक झाली तर  ताबडतोब अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे पदाधिकारी, ग्राहक सेवा केंद्र येथे संपर्क साधून त्याविरुद्ध  कायदेशीर कारवाई करावी असे प्रतिपादन अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे तालुका अध्यक्ष गोपाळ मंत्री यांनी केले.शहरातील तहसील कार्यालयात दिनांक 21 मार्च रोजी जागतिक ग्राहक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी  अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे सचिव सय्यद ताजुद्दीन, कोषाध्यक्ष महेमूद शेख, ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य सोपान टोले, महिला तालुका अध्यक्ष अभिलाषा मंत्री, जिल्हा सदस्य प्रतिमा वाघमारे, शहराध्यक्ष सुधाकर चव्हाण, अभिजीत पुरनाळे, संघटक ॲड राजू देशमुख,  सदस्य परशुराम पापडु, रोहिणी शिंदे आदींची उपस्थिती होती.

   यावेळी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.  तालुकाध्यक्ष गोपाळ मंत्री,सचिव ताजुद्दीन सय्यद, कोषाध्यक्ष महेमूद शेख, पत्रकार राहुल साबणे, महिला सदस्या प्रतिभा वाघमारे, शिवराज मुंडे आदी मान्यवरांनी ग्राहकांचे हक्क व ग्राहक संरक्षण कायद्या संदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास तालुका व शहरातील रास्त भाव दुकानदार संघटनेचे तालुकाध्यक्ष शुद्धोधन सावंत, उपाध्यक्ष गोविंद काळे,जिल्हा सचिव प्रवीण रायभोळे ,पत्रकार राहुल साबणे, गजानन पारवे, वृक्षप्रेमी शिवराज मुंडे, रुक्मिणी लटपटे,रामराव राठोड, उपसरपंच पांडुरंग लटपटे,जना मुंढे, सह शहरातील नागरिक यांची  उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुरवठा निरीक्षक तथा नायब तहसीलदार प्रीतम डोडाल यांनी केले तर सूत्रसंचालन रास्तभाव दुकानदार संघटनेचे तालुकाध्यक्ष शुद्धोधन सावंत यांनी केले व आभार रामराव राठोड,गंगाधर कदम यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी तहसील प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या