सानपाड्यात शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा*

महाराष्ट्राचे आराध्य दैवत  श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव १७ मार्च २०२५ रोजी  सेक्टर ५  मधील सोमनाथ वासकर यांच्या शाखेच्या वतीने प्रतिवर्षी प्रमाणे  करण्यात आला.  याप्रसंगी भव्य पालखीची मिरवणूक काढण्यात आली होती. या पालखी सोहळ्याला शिवसेनेचे सर्व पदाधिकारी महिला,युवासेना जेष्ठ शिवसैनिक आणि विभागातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

 याप्रसंगी  जिल्हाप्रमुख प्रवीण म्हात्रे, संपर्क प्रमुख  एम. के.  मढवी,  उपजिल्हाप्रमुख  प्रकाश पाटील ,महानगर प्रमुख सोमनाथ वास्कर,  देणगीदार विजय वीरकर. संजय कदम, म्हात्रे मॅडम यांची  विशेष उपस्थिती होती. 

सानपाडा सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मिलिंद सूर्याराव आणि शुभांगी सूर्याराव यांनी प्रख्यात व्याख्याते प्रशांत देशमुख यांचे सेक्टर ८  मधील हुतात्मा  बाबू गेनू मैदानावर व्याख्यान आयोजित केले होते. याप्रसंगी प्रशांत देशमुख यांनी सांगितले की,  छत्रपती शिवाजी महाराज हा प्रत्येकाच्या अभ्यासाचा विषय झाला पाहिजे.  घरोघरी त्यांचे पारायण करण्याची गरज आहे छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर जय म्हणताना आमच्या हृदयाचा होणारा विकास म्हणजे इतिहास  आणि शिवाजी महाराज म्हणजे इतिहास हे महाराष्ट्राच्या माणसाचे समीकरण आहे. महाराष्ट्रात जन्माला आल्यामुळे आम्हाला तो अनुभव येतो आहे. शिवाजी महाराजांचे नातं सामान्य माणसांच्या जीवाशी घडले. त्यांच्या काळात राजेशाही होती पण आजच्या लोकशाहीची पाऊले शिवाजी महाराजांच्या राजेशाहीत उमटलेली आहेत. लोकशाहीला सुरुवात इंग्रज आल्यापासून नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकशाहीला सुरुवात केली. महाराजांनी स्वराज्यासाठी मरायला तयार असलेली माणसं तयार केली. त्यांच्यामधील आत्मविश्वास वाढविला. सामान्य माणसाच्या जीवाशी जोडणारे नाते तयार केले.

माजी सनदी अधिकारी विजय नाहाटा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचाराचा जागर करण्याचा कार्यक्रम केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. याप्रसंगी व्यासपीठावर दैनिक लोकमतचे वार्ताहर,  पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाचे कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव,  सामाजिक कार्यकर्ते रणवीर पाटील,  आप्पा देशमुख,  पंडित द्वारकाप्रसाद भट, 

आदी मान्यवर उपस्थित होते. 

सानपाडा स्टेशन जवळील उद्धव बाळासाहेब ठाकरे  शिवसेना शाखा क्रमांक ७६ च्या  वतीने सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन मुलांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. विजेत्या स्पर्धकांचा सन्मान चिन्ह देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले. विभाग प्रमुख अजय पवार यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले.  सेक्टर १०  मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या वतीने शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला.  याप्रसंगी करमणुकीसाठी  मराठी मध्यवृद्धाचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी शिवसेना शिंदे गटाचे सानपाडा  उपविभाग प्रमुख देवेंद्र चोरगे यांनी आलेल्या मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. 

आपला 

 मारुती  विश्वासराव

टिप्पण्या