*भगवान रजनीश संबोधी दिन उत्साहात संपन्न*


 नांदेड:( दि.२२ मार्च २०२५)

               भगवान रजनीश यांचा संबोधी दिन दि. २१ मार्च रोजी संपूर्ण भारतात आणि जगभर साजरा केला जातो. संबोधी दिनाचे औचित्य साधून विवेकनगर येथील भगवान रजनीश मीरा ध्यान केंद्र येथे भगवान रजनीश प्रेमी, साधक आणि संन्यासींसाठी संबोधी दिनाचे आयोजन भगवान रजनीशद्वारे संन्यासीत स्वामी गोपाळ भारती यांच्या मार्गदर्शनानुसार आणि स्वामी प्रेम प्रशांत आणि मा प्रेम सुगंधा यांच्या नियोजनानुसार करण्यात आले होते. सदरील वातानुकूलित ध्यान केंद्र हे नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर सेवानिवृत्त प्रा. सुनील नेरळकर( स्वामी चैतन्य सुनील) यांच्या विवेकनगर स्थित निवासस्थानी आहे. संबोधी दिन शिबिर आणि दररोज सकाळी साडेसहा ते साडेसात कीर्तन ध्यान नियमित नि:शुल्क घेतले जाते.

                  या शिबिरात कुंडलिनी ध्यान, सायलेंट सीटिंग, डान्स मेडिटेशन, व्हाईट रोब ब्रदरहुड, संध्या सत्संग, लिसनिंग मेडिटेशन आणि श्वास उश्वासाचे ध्यान प्रयोग घेण्यात आले. या शिबिराचे संचालन प्रा. सुनील नेरळकर (स्वामी चैतन्य सुनील) आणि तुलसी पेंट्स व तुलसी कम्फर्टचे ओनर सुरेश धूत यांनी केले.

                  या शिबिरात यशवंत महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ.अजय गव्हाणे, प्रा.महेंद्र देशमुख, उमरी, सुभाष रणवीर, उमरखेड, शामसुंदर मोतेवार, भागवत कापसे, स्वामी सत्यजित, अरविंद पटेल, रामदास, अशोक बोधनकर, सरला पनाड, सारिका बगाते, मां सूर सरिता, सौ. शरयूताई नेरळकर आदींनी सक्रिय सहभाग घेतला.

                ध्यान शिबिरानंतर सहभागी साधकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

टिप्पण्या
Popular posts
श्री.जगदंबा माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयाचे २० वर्षानंतर एकत्र आलेले दहावीचे माजी विद्यार्थी.
इमेज
फलटणच्या महिला डॉक्टरची आत्महत्या गृहविभागाच्या अब्रुची लक्तरे वेशीला टांगणारी..गृहखाते झेपत नसेल तर राजीनामा द्या: हर्षवर्धन सपकाळ
इमेज
सेलू येथे शालेय विभागीय कबड्डी क्रीडा स्पर्धा थाटात संपन्न* *गांधी विद्यालय परभणी मनपा विजयी*
इमेज
हिरकणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था माहूर येथे राष्ट्रीय एकता दिवस साजरा.
इमेज
विकसित महाराष्ट्र 2047 अंतर्गत युवा आणि क्रीडा संवाद कार्यक्रमासाठी परभणी जिल्ह्याचे आढावा बैठक संपन्न
इमेज