यशवंत ' मध्ये डॉ.श्रीरंजन आवटे यांच्या व्याख्यानाचे आयोजन

 नांदेड:( दि.२७ जानेवारी २०२५)

                श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात पीएम:उषा योजनेतील सॉफ्ट कंपोनंट ऍक्टिव्हिटी अंतर्गत दि.२८ जानेवारी २०२५, मंगळवार रोजी सकाळी ठीक १०:३० वाजता ह्युमॅनिटीज स्मार्ट क्लासरूम येथे पत्रकार, स्तंभलेखक आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथील राज्यशास्त्र विषयाचे डॉ.श्रीरंजन आवटे यांचे 'भारतीय संविधान: आपलं आयकार्ड' या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे.

                       कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे भूषविणार आहेत.

                      तरी या व्याख्यानास उपस्थित राहण्याचे आवाहन उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे, राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ.अजय गव्हाणे आणि डॉ.वीरभद्र स्वामी यांनी केले आहे.

टिप्पण्या