बरबडा साहित्य संमेलन एक लौकिक व वैचारिक सोहळा

ग्रंथदिंडी 

स्वातंत्र्यसेनानी गोविंदरावजी धर्माधिकारी बरबडेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित बरबडा येथील ग्रामीण साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. 

सकाळी ७ :३० वाजता ग्रंथदिंडीच्या कार्यक्रमाने सुरूवात झाली.

ग्रंथ दिंडीचे उद्घाटन माजी प्राचार्य मा. व्ही.टी. सुरेवाड व संमेलन अध्यक्षा व समवेत शिक्षणतज्ज्ञ डॉ सुरेश सावंत यांच्या हस्ते ग्रंथाची पुजा व रिबीन कापून करण्यात आले.

ग्रंथ दिंडी शाळेपासून गावात फिरण्यासाठी निघाली.

 या ग्रंथदिंडीत संमेलन अध्यक्षा डॉ. सौ. मथुताई सावंत, स्वागताध्यक्ष मा.दिलीपराव धर्माधिकारी , कार्याध्यक्ष मा.सदाशिवराव धर्माधिकारी डॉ. सुरेश सावंत, जगदीश कदम, नारायण शिंदे, राजेंद्र गहाळ, रामभाऊ शेवडीकर , निर्मलकुमार सुर्यवंशी,मा. सौ.छायाताई धर्माधिकारी,मा.जगदीशराव धर्माधिकारी ,मा.इरन्ना कंडापल्ले बालिका बरगळ इ मान्यवर उपस्थित होते.

ग्रंथदिंडीत भारत माता, लेझिम, वारकरी दिंडी, शिवाजी महाराज, माँसाहेब जिजाऊ, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, एकनाथ, सोपान मुक्ताबाई, अहिल्याबाई होळकर, लोकमान्य टिळक, गांधीजी यांच्या वेशभूषेतून सामाजिक एकता व समृद्धीचा संदेश देणारे अनेक देखावे मनोवेधक होते.

त्याचबरोबर आदिवासी नृत्य यातून आदिवासी जगण्यातील वागण्यातील लकब, बोलाचाली यातील सुक्ष्मम निरिक्षणे दाखवणारे अनेक प्रसंग विद्यार्थ्यांनी सादर केले.

तसेच संमेलनाध्यक्षा डॉ सौ मथुताई सावंत, माजी संमेलनाध्यक्ष राजेंद्र गहाळ, प्राचार्य सुदर्शनराव धर्माधिकारी संमेलनाध्यक्षा

यांची झुल घातलेल्या बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. ते मनोवेधक दृष्य अविस्मरणीय होते. गावातून फिरत असतांना जागोजागी ग्रंथ पालखीतील ग्रंथाचे पूजन करण्यात आले. तसेच संमेलन अध्यक्षासह संमेलनातील मान्यवरांचा गावात जागोजागी सन्मान करण्यात आला.

पहिले सत्र

सकाळी दहा वाजता संमेलनाच्या मुख्य कार्यक्रमास सुरुवात झाली.

संमेलनाच्या अध्यक्षा प्रा.डॉ.सौ.मथुताई सावंत, उद्घाटक म्हणून राज्याचे सहकारमंत्री मा. ना. बाबासाहेब पाटील, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मा. आ. प्रतापराव पाटील चिखलीकर, मा. आ. विक्रम काळे, मा. आ. राजेश पवार इ. मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

स्वागताध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी , कार्याध्यक्ष सदाशिवराव धर्माधिकारी, ग्रंथदिंडीचे उद्घघाटक सुरेवाड सर प्रमुख पाहुणे मा. जगदीश कदम, डॉ. सुरेश सावंत, प्रा. नारायण शिंदे, कथाकार राजेंद्र गहाळ, रामभाऊ शेवडीकर, संस्थे सदस्य शिवाजीराव धर्माधिकारी, छायाताई धर्माधिकारी, जगदीशराव धर्माधिकारी, इरन्ना कंडापल्ले, सरपंच माधवराव कोलगाने, ज्योतीताई धर्माधिकारी, विजयालक्ष्मी धर्माधिकारी इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

सर्वप्रथम मान्यवरांचा यथोचित सन्मान व सत्कार करण्यात आला. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

त्यानंतर संस्थेचे द्विगंत सदस्य नारायणराव सर्जे गुरूजी, देवीदासराव नेरलेवाड व प्रा. शिवाजी हंबर्डे यांना श्रद्धांजली वाहिली. नंतर कार्यक्रमास सुरुवात झाली.

संस्थेचे दिलीपराव धर्माधिकारी धर्माधिकारी यांनी प्रास्ताविक भाषणामध्ये संस्थेच्या माध्यमातून राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक परंपरेतून आम्ही सामाजिक हित जपत आहोत . तसेच ग्रामीण भागातील गोरगरीब मुलांना उच्च ध्येय गाठण्यासाठी संस्थेच्या संमेलनासारखे अनेक उपक्रम घेतले जातात. या वर्षी महिला साहित्य संमेलनाच्या माध्यमातून स्त्री शक्ती व तिचे शिक्षणासाठी प्रेरणा मिळावी असा आमचा उद्देश आहे. तसेच स्वातंत्र्य सेनानी गोविंदरावजी धर्माधिकारी यांनी महिलांसाठी केलेले भरीव कार्य यास उजाळा मिळावा त्याचे तत्व पुढे संक्रमित व्हावे व विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी हा यामागे मुख्य उद्देश आहे.असे मत व्यक्त केले. वैज्ञानिक दृष्टिकोन, संस्कारातून विज्ञान व व्यावसायिक शिक्षण असा आमचा भावी पिढीच्या संमृद्धीचा ध्यास आहे. त्याचा आम्ही सातत्याने भविष्यात पाठपुरावा करणार आहोत.

प्रविण पाटील चिखलीकर यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा व प्रोत्साहन देणारे बरबड्यासारखे ग्रामीण साहित्य संमेलने हे पुढील पिढीला दिशादर्शक ठरतील असे मत व्यक्त केले.

शिवराज पाटील यांनी किर्तन ,प्रवचन , सप्ताह या बरोबरच ग्रामीण साहित्य संमेलने गावागावातून झाले पाहिजे.

त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे ध्येय गाठण्यासाठी मोलाचे ठरते.गावागावातील राजकारण कमी करून अशी संमेलने घेतली तर भावी गाव प्रगती पताकडे जावू शकते.असे मत व्यक्त केले

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी उद्घाटनपर भाषणात म्हणाले बरबड्यासारख्या गावात अशी संमेलने होतात त्यामुळे विद्यार्थ्यां घडतात. जिल्हापरिषद शाळा व संस्था या शाळांमध्ये फरक आहे. तो फरक संस्था व जिल्हापरिषद शाळेच्या सहसमन्वय व ज्ञानाची देवाणघेवाण यामुळे दूर होईल. पुढील भावी पिढी सफल बनेल असे वाटते.आज मुलांपेक्षा मुली सरस होत आहेत. या माध्यमाचा काळात प्रगती मुली घरात न राहता सगळे खेळ खेळत आहेत. कुस्तीसारख्या खेळात मुलांना चित्त करत आहेत. मुलींनी डॉ सौ मथुताई सावंत सारख्या लेखिकेचा आदर्श ठेवून जीवनात सकारात्मकता ठेवून पुढे गेले पाहिजे.या माध्यमाच्या काळात मुले आणि मुलींनी उत्तरोत्तर पुढे जाण्यासाठी नकारात्मकता सोडून द्या आत्महत्या करु नका असं करणाऱ्या लोकांना त्यापासून परावृत्त करा.

शिक्षकांनी अंतकरणातून शिकवले पाहिजे. विद्यार्थ्यांनी शिक्षकाचा आदर करावा. शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आदर्श विद्यार्थ्यानी घेतला पाहिजे.असे त्यांच्या अनेक उदाहरणातून पटवून दिले. शेतीचे अर्थकारण समजून शाळेबरोबर विद्यार्थ्यानी शेतीचे अर्थकारण समजून घेतले पाहिजे.असे प्रतिपादन केले.

डॉ. सौ. मथुताई सावंत यांनी मत मांडताना -

आजचा भवताल भयंकराच्या दारात उभा आहे. एकीकडे सत्ता आणि बळाचा अनिर्बंध वापर तर दुसरीकडे भय, भूक आणि दारिद्र्य आहे. ज्यांचा आवाज क्षीण झालाय तो बुलंद करण्यासाठी, दुर्बलांचे मनोबल वाढविण्यासाठी लेखकांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. सध्या जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरणाकडे समाज वळतोय, हे चित्र फारच भयानक आहे. अशा वेळी साने गुरुजींसारखे हळवे साहित्य लिहून समाजाच्या संवेदना जागवाव्यात, की केशवसुतांची गगनभेदी तुतारी पुन्हा फुंकावी अन् क्रांतीचा एल्गार करावा? अशा परिस्थितीत युवक-युवती, लेखक, कलावंत, पत्रकार, विचारवंत अशा अनुभवी नि विचारी लोकांचे संघटन करून नवसमाजबांधणी करण्याची गरज आहे. समाजातील दुष्कृत्यांवर वार करण्यासाठी जहाल विचारांची पेरणी करणारे, इतिहास घडविणारे शब्दप्रभू आमच्यातून निर्माण व्हायला हवेत. अशा साहित्य संमेलनांच्या आयोजनामागील हेतूच मुळी हा असतो. किंबहुना साहित्य संमेलन म्हणजे अतिशय सभ्यपणे आणि विचारपूर्वक चालविलेले वैचारिक आणि सामाजिक आंदोलन असते, असे मी मानते. इथे उपस्थित आपण सगळे त्या आंदोलनाचाच एक भाग आहोत, असे परखड विचार डॉ .सौ .मथुताई सावंत यांनी मांडले.

कुटुंब, समाज, संस्कृती व देशाच्या उभारणीत स्त्रीशक्ती  मोलाची भूमिका बजावत असते. शिक्षण संस्कृतींची मुळ संकल्पना ही घरातून सुरू झालेली असते. प्रत्येक जन्मलेल्या बाळाची पहिली गुरु ही आई असते. बाळ सर्वप्रथम कौटुंबिक शाळेतून सामाजिक शाळेत प्रवेश करते. शिक्षण होऊन संपूर्ण परिपूर्ण होईपर्यंत आई ही प्रत्येकाच्या आयुष्यात  आई ही शिदोरी असते . तरीही या आधुनिक विज्ञान व माध्यमांच्या जगातही तिची सामाजिक, कौटुंबिक उपेक्षा संपलेली दिसत नाही. ती संपवण्यासाठी स्त्रियांनी शिकून स्वयंपूर्ण झाले पाहिजे. तिला स्वयंपूर्ण करण्यासाठी स्वातंत्र्यसेनानी गोविंदरावजी धर्माधिकारी बरबडेकर यांच्या घराण्यातील कामासरखी सातपूर्ण सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व सांस्कृतिक कामाची समाजास गरज आहे. यासाठी अनेक संस्था स्त्री सबलीकरणासाठी पुढे आल्या पाहिजेत, ही काळाची गरज आहे. कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक या सगळ्या निर्णय प्रक्रियेत स्त्रियांना सामावून घेतले पाहिजे.असे त्यांनी भाषणातून सांगितले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश्वरी कदम यांनी केले. तर आभार संस्थेचे सहसचिव तथा प्राचार्य सुदर्शनराव धर्माधिकारी यांनी केले.

दुसरे सत्र:

दुसऱ्या प्रकट मुलाखत या सत्रात सुचिता खल्लाळ यांची मुलाखत प्रा. व्यंकटी पावडे आणि प्रा. व्यंकटेश सोळंके यांनी घेतली. मुलाखतकारांनी चौफेर प्रश्न विचारले. अनेक प्रश्नांना उत्तरे देत सुचिता खल्लाळ यांनी विद्यार्थ्यांशी आधुनिक काळ, माध्यमे यांचा सकारात्मक वापर करून स्वतःला घडवले पाहिजे. अनेक संकटे पार करत आपले ध्येय साध्य केले पाहिजे, असा संदेश दिला. शेतीसमस्या, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि उत्पादनप्रक्रिया याबद्दल विस्तृत उत्तरे दिली.

त्यांची साहित्य प्रक्रिया, शिक्षण व शिक्षण विस्तार अधिकारी या पदापर्यंतचा खडतर प्रवास मांडला.त्यातून विद्यार्थ्यांनी कठीण परिस्थितीत अनेक आव्हानांना कसे सामोरे जावे व आपल्या मनापर्यंत कसे पोहचावे यांचे विस्तृत अनुभवातून प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

दोन पिढ्यांतील वाढती दरी या प्रश्नाचे त्यांनी भावनिक उत्तर दिले . काळ आणि वेळ कधीच थांबत नसते.

काळाचा महिमा फार वेगळा असतो. नव्या व जुन्यांनी मतभेद व अहंभाव विसरून एकत्र यावेत. सातत्याने संवाद करावेत म्हणजे आपोआपच दोन पिढ्यांतील दरी भरून निघेल.

शिक्षणाविषयी निरंतर प्रक्रिया आहे. मुलींनी शिक्षण शिक्षण घेऊन संमृद्ध व्हावे व समाजानी तिला निर्णय प्रक्रियेत सामावून घ्यावे असे मत मांडले.

प्रा. व्यंकटी पावडे आणि प्रा. व्यंकटेश सोळंके यांनी विचारलेल्या प्रश्नांना सुचिता खल्लाळ यांनी समर्पक व सुत्रबद्ध उत्तरे दिली. मुलाखत नियोजित वेळेत आशयपूर्ण झाली. 

या सत्राचे सूत्रसंचालन प्रा. टी. जे. तगडपल्लेवार यांनी केले तर आभार अक्कमवाड  यांनी मांडले.

तिसरे सत्र 

तिसरे सत्र कविसंमेलनाचे होते. या सत्राच्या अध्यक्षा बालिका बरगळ ह्या होत्या. होत्या.कविसंमेलनात उषाताई ठाकूर, रुपाली वागरे, अनिता जाधव, रुचिरा बेटकर, अलका मुगटकर, रोहीनी पांडे, अंजली कांनिंदे, ज्योती करवंदे या कवयित्रींनी सहभाग नोंदवला होता.

तसेच विद्यालयातील विद्यार्थी उजमा शेख , गंगासागर धुमाळे व किरण हाणमंते यांनी सहभाग घेतला होता. 

कवयित्रींनी शांत, संयमी, संथ व लयबद्ध आवाजात कविता सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले.

उजमा शेख ह्या विद्यार्थ्यीनीने अरे खोप्यामंधी खोपा सुगरणीचा चांगला व काय सांगू राणी तुला गाव सुटेना हे दोन गीत सुमधुर व सुरेल आवाजात गात अक्षरशः सभागृह डोक्यावर घेतले.

कविसंमेलनाच्या अध्यक्षा बालिका बरगळ यांनी या मातीचे लौकिक सांगणारी कविता सादर करून अध्यक्षीय समारोप केला.

कविसंमेलनाचे सूत्रसंचालन  संतोष पचलिंग यांनी केले, तर आभार शिंगनवाड  यांनी मानले.

मान्यवरांची उपस्थिती :

या कार्यक्रमास गावातील व परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड.भाऊसाहेब गोरठेकर, प्रदेश सरचिटणीस विक्रम देशमुख तळेगावकर, प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे, संस्थेचे उपाध्यक्ष तथा संमेलनाचे कार्याध्यक्ष सदाशिवराव धर्माधिकारी,बरबडा नगरीचे सरपंच माधवराव कोलगाने, संस्थेचे ज्येष्ठ संचालक व्ही.टी सुरेवाड, शिवाजीरावधर्माधिकारी, सौ.छायाताई धर्माधिकारी, इरन्ना कंडापल्ले, बाळासाहेब हरीहरराव भोसीकर, फेरोज पटेल,संभाजी मुकणार,बाळासाहेब रावणगावकर, विठ्ठलराव चव्हाण, बालाजीराव शेळके,  रणजीत पाटील हिवराळे, दिपक पाटील चोळाखेकर, प्रभाकर पवार, गंगाधर मरकुटे, शिवचंद्र पाटील डांगे, श्रीधर नागापूरकर, एकनाथराव गायकवाड, सुरेशराव बिल्लेवार, प्रा.पोतदार, मिलींद पवार, पंडीत पाटील जाधव, गणेश पाटील नरवाडे, हौसाजी पाटील शिंदे,बालाजीराव धर्माधिकारी,सदाशिव पाटील पचलिंग, विश्वनाथ बडूरे,बालाजीराव घोसलवाड, संस्थेचे सहसचिव तथा प्राचार्य सुदर्शन धर्माधिकारी, उपमुख्याध्यापक गणेश बडूरे, सूर्यकांत फड, तुकाराम तगडपल्लेवार, वसंत शिंदे, साईनाथ नेरलेवाड, सदाशि कवळेगावातील व परिसरातील साहित्यप्रेमी, शिक्षक  शिक्षकेतर कर्मचारी वविद्यार्थी उपस्थित होते.

या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जवाहरलाल नेहरू शिक्षण समितीचे सदस्य, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.

व्यंकटेश सोळंके, कामणगावकर

(९९२२६५४७३२)

टिप्पण्या