कामगार महर्षी स्व. गं.द. आंबेकर स्मृती कबड्डी स्वामी समर्थ, शिवशक्ती आणि विजय क्लबला जेतेपद

मुंबई -  राष्ट्रीय मिल मजदूर संघ आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ आयोजित कामगार महर्षी गं.द. आंबेकर स्मृती कबड्डी महोत्सवाच्या महिल...



मुंबई -  राष्ट्रीय मिल मजदूर संघ आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ आयोजित कामगार महर्षी गं.द. आंबेकर स्मृती कबड्डी महोत्सवाच्या महिला गटात अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम लढतीत बलाढ्य शिवशक्तीने डॉ. शिरोडकर स्पोर्ट्स क्लबचा 35-30 असा पराभव करीत जेतेपद पटकावले. पुरुषांच्या स्थानिक गटात विजय क्लबने जय भारत क्रीडा संघाचा पराभव करत बाजी मारली तर व्यावसायिक गटात स्वामी समर्थने रिझर्व बँक स्पोर्ट्स क्लबचा 34 -32 असा अवघ्या दोन गुणांनी पराभव करीत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

राष्ट्रीय मिल मजदूर संघ आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने कामगार महर्षी आंबेकरांच्या स्मृतीनिमित्त ना.म.जोशी मार्गावरील श्रमिक जिमखान्यावर आयोजित केलेल्या कबड्डी महोत्सवात आज कबड्डी प्रेमींना ठराविक सामन्यांचा मनमुराद आनंद लुटता आला. महिलांच्या गटात बलाढ्य शिवशक्ती महिला संघाला जेतेपद पटकावताना डॉक्टर शिरोडकर स्पोर्ट्स क्लबशी कडवी झुंज द्यावी लागली. मध्यंतराला शिवशक्तीकडे 20-16 अशी चार गुणांची आघाडी होती. दुसऱ्या सत्रात शिरोडकरच्या चढाई पटूंनी जोरदार संघर्ष करत शिवशक्ती शी बरोबरी साधण्याचा वारंवार प्रयत्न केला. मात्र ते थोडक्यात अपयशी पडले आणि शिवशक्तीने 35 30 असा विजय मिळवत आपल्या जेतेपदांची मालिका कायम राखली.

शिरोडकरच्या मेघा कदमला सर्वोत्कृष्ट चढाईपटूचा तर शिवशक्तीच्या पौर्णिमा झेंडे आणि प्रतीक्षा तांडेल यांना अनुक्रमे सर्वोत्कृष्ट पकडपटू आणि सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला.

व्यावसायिक गटात स्वामी समर्थ आणि रिझर्व बँक स्पोर्ट्स क्लब यांच्यातला अंतिम सामनाही अत्यंत चुरशीचा झाला. या लढतीत

रिझर्व बँक स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडूंनी आक्रमक खेळ करत मध्यंतराला 13-11 अशी दोन गुणांची आघाडी आपल्याकडे राखली होती. मात्र दुसऱ्या सत्रात स्वामी समर्थच्या चढाई बहाद्दरांनी वेगवान खेळ करत आधी बरोबरी साधली आणि नंतर आघाडी घेत ती शेवटपर्यंत कायम राखत जेतेपदही पटकावले. त्यांनी हा संघर्ष 34- 32 असा जिंकला. स्वामी समर्थचा यश चोरगे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. स्पर्धेतील सर्वोत्तम चढाई पटू आणि पकरविराचा मान दीपक सांगळे आणि रुपेश साळुंखे यांनी संपादला.

पुरुषांच्या स्थानिक गटात मात्र विजय क्लब आणि जय भारत क्रीडा संघात झालेला अंतिम सामना अत्यंत एकतर्फी झाला. विजय क्लबच्या खेळाडूंनी प्रारंभीच पल्लेदार चढाई करत सतरा पाच अशी आघाडी घेत सामन्यावर वर्चस्व मिळवले. दुसऱ्या सत्रातही जय भारत च्या खेळाडूंचे काहीही चालू शकले नाही परिणामतः विजय क्लबने ही लढाई 27-13 अशी सहज जिंकली. विजय क्लब चा अक्षय सोनी स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला जयवादाचा दीपेश पाटील आणि एस एस जी चा ओमकार थोटे सर्वोत्कृष्ट चढाई आणि पकडवीर ठरला.

स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आणि आमदार सचिनभाऊ अहिर, आमदार महेश सावंत, सरचिटणीस गोविंदराव मोहिते, निवृत्ती देसाई, अण्णा शिर्सेकर क्रीडा प्रमुख सुनिल बोरकर आदींच्या 

उपस्थितीत पार पडला.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group