टेनिस व्हॉलिबॉल महाराष्ट्र असोसिएशन ची नवीन राज्य कार्यकारिणी निवड*

*डॉ.व्यंकटेश वांगवाड, सीईओ ,सुरेशरेड्डी क्यातमवार अध्यक्षपदी तर गणेश माळवे सरचिटणीस बिनविरोध निवड*

परभणी (.           )  टेनिस व्हॉलीबॉल महाराष्ट्र संघटनेच्या अध्यक्षपदी सुरेश रेड्डी क्यामतवार यांची तर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ व्यंकटेश वांगवाड, कार्याध्यक्ष म्हणून डॉ. आबासाहेब सिरसाठ यांची निवड करण्यात आली आहे. सरचिटणीस म्हणून गणेश माळवे , कोषाध्यक्ष डॉ दिनेश शिगारम यांची फेरनियुक्ती करण्यात आली. उपाध्यक्ष पदी रामेश्वर कोरडे, आनंद खरे, किशोर चौधरी यांची निवड झाली आहे.

          दि. ८ डिसेंबर रोजी  गंगापूर येथे भारतरत्न मदर टेरेसा इंग्लिश स्कूल येथे पार पडलेल्या  टेनिस व्हॉलीबॉल महाराष्ट्र असोसिएशनच्या २०२४-२८ च्या राज्य कार्यकारी निवड प्रक्रिया समितीच्या बैठकीत पुढील चार वर्षांसाठी नवीन पदाधिकारी यांची निवडणूक घेण्यात आली. खेळाचे जनक

डॉ. व्यंकटेश वांगवाड व भारतीय टेनिस व्हॉलिबॉल फेडरेशनचे महासचिव आनंद खरे यांनी निरीक्षक म्हणून काम पाहिले.

      महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष म्हणून सुरेशरेड्डी क्यातमवार तर कार्याध्यक्ष म्हणून डॉ. आबासाहेब सिरसाठ यांची निवड करण्यात आली. तसेच सरचिटणीस म्हणून सेलू येथील गणेश माळवे यांची फेरनिवड सर्वानुमते झाली. कोषाध्यक्ष म्हणून डॉ. दिनेश सिंगाराम (पुणे) हे काम बघणार आहेत. उपाध्यक्ष म्हणून किशोर चौधरी (जळगाव), आनंद खरे (नाशिक), रामेश्वर कोरडे (बीड) यांची निवड झाली. तसेच सहसचिव म्हणून रणजित चामले (पुणे), प्रफुल्ल बनसोड (पुणे), प्रशांत कोल्हे (जळगाव), मकरंद कोहळकर (अहिल्यानगर), जयदीप सोनखासकर (अमरावती) मिलिंद कुलकर्णी (सांगली)हे काम पाहणार आहेत. तसेच विभागीय सचिव म्हणून छत्रपती संभाजीनगर विभाग प्रमोद महाजन, पुणे विभाग संतोष खेडे, मुंबई विभाग अशोक शिंदे, नाशिक विभाग किरण घोलप, कोल्हापूर विभाग मिलिंद कुलकर्णी, अमरावती विभाग डॉ. विवेक गुल्हाने, लातूर विभाग डॉ. राहुल वाघमारे यांची निवड करण्यात आली. तसेस प्रा . नंदकिशोर देशपांडे,प्राची कडणे, संजय ठाकरे, उज्वल पाटील यांची कार्यकारणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.

  समिती प्रमुखांची निवड करण्यात आली.
1)तांत्रिक समिती अध्यक्ष सतिश नावाडे, सचिव: प्रफुल्लकुमार बनसोड (पुणे),सदस्य :- संजय ठाकरे (हिंगोली)
२)रेफरी बोर्ड :अध्यक्ष :- गणेश पाटील (जळगाव)
सचिव :- निलेश माळवे
(परभणी)सदस्य :-    (.)
३) शिस्तपालन समिती :-
अध्यक्ष:- राजेंद्र महागाडे
सचिव :- अशोक शिंदे (ठाणे)
सदस्य: शिवराज पाळणे (अ.नगर)
4) नियमावली समिती:-
अध्यक्ष:- आशिष ओबेराय (मुंबई शहर) सचिव :- डॉ दशरथ देशिंगे (सांगली)
५)कार्यक्रम समिती:-
अध्यक्ष :- आनंद खरे (नाशिक) सचिव प्रा.नागेश कान्हेकर, ६) आचार समिती :-अध्यक्ष:-डॉ. रितेश वांगवाड (पुणे),सचिव: सतिश भेंडेकर
सदस्य:7)विकास समिती:- अध्यक्ष:- आनंद परतानी (छ. संभाजीनगर) सचिव:- अनिल सोनवणे (जळगाव)
8)लवाद आयोग:-
अध्यक्ष:- विजय संतान (पुणे)
सचिव :- जनट टेकाळे (पुणे)
सदस्य :- 
९)महिला समिती :-अध्यक्ष :-  नेहा बनसोड (पुणे) सचिव:- मिरा सोळंके (नांदेड)
सदस्य: भावसार प्रगती (पुणे)
10)प्रसिद्धी समिती:- अध्यक्ष :- शिवाजी वाघमारे (परभणी) सचिव: सुधीर भालेराव (छ. संभाजीनगर) सदस्य बाबासाहेब हेलसकर, 11)ॲथलेट्स कमिशन :- अध्यक्ष: तेजस पाटील (मुंबई सब), सचिव: गणेश कडुले (नाशिक) राहुल पेटकर,(लातूर)

          या सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांना क्रीडा सहसंचालक सुधीर मोरे, क्रीडा उपसंचालक संजय सबणीस, विजय संतान, आ.मेघना दिदी बोर्डीकर साकोरे, आ. गुलाबराव पाटील, हरीभाऊ लहाने, महाराष्ट्र ऑलिम्पिक सरचिटणीस नामदेव शिरगावकर, आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पण्या