*'यशवंत ' मधील प्रा.माधव पुयड यांना पीएच.डी. प्राप्त* नांदेड:(

दि.२५ ऑक्टोबर २०२४)
          श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील इंग्रजी विभागात कार्यरत असलेले प्रा.माधव पुयड यांना 'नयनतारा सहगल यांच्या निवडक कादंबऱ्यांतील नवइतिहासवाद' या विषयामध्ये विद्यावाचस्पती (पीएच.डी.) प्राप्त झाली आहे.
           प्रा. माधव पुयड हे अभ्यासू व अत्यंत मेहनती शिक्षक म्हणून ओळखले जातात.  त्यांनी डॉ. जीवन मसुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. प्राप्त केली आहे.
           या यशाबद्दल वडील भुजंगराव केशवराव पुयड, आई सौ. शशिकला भुजंगराव पुयड, माजी प्र-कुलगुरु व विद्यमान प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे, उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे तथा डॉ.हरिश्चंद्र पतंगे, मार्गदर्शक डॉ. जीवन मसुरे,  इंग्रजी विभागप्रमुख डॉ.एल. व्ही. पदमारानी राव, डॉ.अजय टेंगसे, डॉ. रत्नमाला मस्के, प्रा.माधव दुधाटे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने, प्रसिद्धी समन्वयक डॉ.अजय गव्हाणे तसेच  सिंधी गावकरी व मित्र परिवाराने त्यांचे स्वागत केले आहे.

टिप्पण्या