राम दातीर
माहूर (प्रतिनिधी )मुखेड तालुक्यातील बारहळी येथील दै.पुढारी चे प्रतिनिधि तथा व्हॉईस ऑफ मीडियाचे सदस्य अजित पवार यांचेवर दि.२२ऑक्टों.रोजी काही समाजकंटकांनी भ्याड हल्ला केला.त्या घटनेचा माहुर येथील व्हॉईस ऑफ मीडिया, द पॉवर ऑफ मीडिया व अन्य संघटनेच्या वतीने दि.२५ ऑक्टों.रोजी तीव्र निषेध व्यक्त करून तहसीलदार यांचे मार्फत जिल्हाधिकारी नांदेड यांना दिलेल्या निवेदनातून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
तहसीलदार यांचे मार्फत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना विविध पत्रकार संघटनेच्या वतीने दिलेल्या निवेदनात वृत्तपत्रात विरोधात वृत्त प्रकाशित केल्याचा राग मनात धरून मुखेड तालुक्यातील पुढारी वृत्तपत्राचे प्रतिनिधी तथा व्हाईस ऑफ मीडियाचे सदस्य अजित पवार यांना दि. २२ ऑक्टो.२०२४ रोजी काही गाव गुंडांनी रस्ता रोखून जबर मारहाण केल्याच्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करून अजित पवार यांचेवर भ्याड हल्ला करणाऱ्या समाजकंटकांवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कठोर कारवाई करावी,अशी मागणी केली आहे.निवेदनावर व्हॉईस ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष विजय आमले, द पॉवर ऑफ मिडियाचे तालुकाध्यक्ष अपील बेलखोडे, वसंत कपाटे, राज ठाकुर,अनिल मडपेलीवार, राजू दराडे,सुरेश गिऱ्हे, राम दातीर,जयंत गिऱ्हे, पदमा गिऱ्हे,संजय बनसोड,गजानन कुळकर्णी, शंकर भालेराव आदी पत्रकारांचा स्वाक्षऱ्या आहेत.
addComments
टिप्पणी पोस्ट करा