मैदानी खेळ हे सदृढ आरोग्याची गुरुकिल्ली-डॉ. माधवराव पाटिल किन्हाळकर



. नांदेड दि. – 12 ; स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत 'क' झोन अंतर महाविद्यालयीन क्रॉस कंट्री स्पर्धेचे आयोजन कै.वसंतराव काळे वरिष्ठ महाविद्यालया द्वारे करण्यात आले होते. या स्पर्धेच्या उदघाटन समारंभात डॉ. माधवराव किन्हाळकर यांनी वरिल उद्‌गार काढले. 

कै. वसंतराव काळे वरिष्ठ महाविद्यालय व स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने क्रॉस कंट्री स्पर्धेचे आयोजन दि.12/08/2024 रोजी करण्यात आले या स्पर्धेत आठ महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेचे उद्‌घाटक म्हणून पुढे बोलताना डॉ. किन्हाळकर म्हणाले की, निरोगी आयुष्य जगण्यासाठी प्रत्येक व्यक्तिने मैदानी खेळ खेळला पाहिजे. ज्यामुळे मनोरंजनाबरोबरच निरोगी आरोग्य देखिल लाभते. प्रमुख पाहुणे म्हणून, भगवानराव पाटिल आलेगावकर म्हणाले की, महिती तंत्रज्ञानाच्या युगात युवक मैदानी खेळापासून दूर जात आहे. त्यामुळे विशेष प्रयत्न करून युवकांना मैदानी खेळाकडे वळवण्याची गरज निर्माण झाली आहे. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्राचार्य डॉ. उमान गणी यांनी केले. या वेळी मंचावर, क झोनचे चेअरमन प्राचार्य डॉ. पंजाब चव्हान, कै. बानो एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मझरोदीन,प्राचार्य डॉ. बाबुराव घायाळ,

क झोन सचिव डॉ. व्यंकट माने, निवड समिती अध्यक्ष, डॉ.उदय चव्हान, डॉ.महेश वाखरडकर,डॉ. किरण येरावार यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. माने यांनी केले तर आभार डॉ. बाबासाहेब भुक्‍तरे यांनी मानले. बक्षीस वितरण कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालय विकास समितीचे सदस्य प्रा.डी.बी. जांभरुणकर हे उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रा. मोहम्मद दानिस, प्रा. अक्षय हासेवाड,प्रा.सय्यद फराज, वैभव दमकोंडवार, मोहम्मद मोहसिन, मोहम्मद अतीफ,डॉ.जी.डी.कदम,डॉ. छाया कोठे,डॉ.दिलीप माने, डॉ.बळीराम इंगळे,डॉ.राहुल सरोदे,मोहम्मद अन्वर,वैभव अंभोरे,डी.व्ही.सोनसळे, गोविंद पांचाळ यांनी विशेष सहकार्य केले

.

टिप्पण्या