शेतकऱ्यांच्या हितासाठी किसान जन आंदोलनाची सुरूवात – सचिन कासलीवाल

 

खते, कीटकनाशकांच्या किमती जीएसटी मुक्त करा..!!

नांदेड,प्रतिनिधी 

शेतीसाठी लागणाया खर्चामुळे शेती नेहमी तोट्यात जाते आहे शेतकऱ्यांना सातत्याने ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, पिकावर अनेक रोगांचे सावट, नापिकी, शेतमालाला मिळणारा कवडीमोल भाव यामुळे शेतीव्यवसाय व शेतकरी, अडचणीत सापडले आहेत. आज शेतकरी राजा हा नावापुरताच राहिला आहे. जगाचा पोशिंदा शेतकरी शेती व्यवसायात उत्पन्न कमी, खर्च जास्त, म्हणून शेतकरी त्रस्त अशी अवस्था आज घडीला निर्माण झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी व लहान कृषी केंद्र चालकांच्या स्वातंत्र्यासाठी किसान जन आंदोलनाची सुरूवात सचिन कासलीवाल यांनी केली आहे..

शेतकरी जेव्हा बी-बियाणे, खते, किटकनाशके, ठिबक संच, मोटार पंप, ट्रॅक्टर खरेदी करतात तेव्हा त्यांच्याकडून ५ % ते २८ % जीएसटी विविध वसुल केला जातो, हा जीएसटी शेतकऱ्यांना परत कसा मिळतो ? तर तो मिळणारची नाही म्हणजे तो बोजा सरळ सरळ शेतकऱ्यांच्या माथी पडतो त्यामुळे शेतीचा उत्पादन खर्च वाढतो ही बाब नाकारून चालणार नाही असे मत सचिन कासलीवाल यांनी व्यक्त केले 


पुढे त्यांनी सांगितले की , शेतीचा वाढलेला भांडवली खर्च कमी करण्यासाठी खते, बियाणे, कीटकनाशके, अवजारे व शेतीशी निगडित असलेल्या सर्व वस्तू जीएसटी मुक्त कराव्यात कारण शेतकरी वर्ग अनेक अडचणींचा सामना करत आहे , शेतीसाठी आवश्यक असणारी रासायनिक खते, बियाणे, कीटकनाशके, अवजारे व इतर वस्तूची खरेदी करताना शेतकऱ्यांना जीएसटी द्यावा लागतो. यामुळे भांडवली खर्चात मोठी वाढ झाली आहे. शेतकऱ्यांनी शेतमाल विक्री केयानंतर जीएसटीचा परतावा मिळण्याची व्यवस्था नाही.त्यामुळे शेतकरी अनेक अडचणीचा सामना करत आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शेतीसाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तूवरील जीएसटी माफ करण्यासाठी अर्थमंत्र्यांनी जीएसटी विभागाकडे पाठपुरावा करावा या मागणीसाठी आपण हा जनजागृती लढा उभारला असल्याचे प्रतिपादन किसान जन आंदोलनाचे संस्थापक श्री सचिन कासलीवाल यांनी शेवटी बोलतांना केले ..

टिप्पण्या