सा.बां. विभागात ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांसाठी शासनाने काढले परिपत्रक

नांदेड-

हेच ते कर्मचारी धावडे, ढगे, साले, पवार
नांदेड-बदली होऊनही दिलेल्या
जागेवर न जाता आहे त्याच ठिकाणी
ठाण मांडून बसलेल्या धावडे, ढगे, साले,
पवार यांच्यासारख्या कर्मचाऱ्यांसाठी
शासनाने थेट जी. आर. (परिपत्रक)
काढले असून अशा कर्मचाऱ्यावर
शिस्तभंगाची कार्यवाही करण्याचे आदेश
महाराष्ट्र शासनाच्या अवर सचिव पूजा
उदावंत यांच्या स्वाक्षारीने काढण्यात आले आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागातील गट क क्षेत्रीय कार्यालयातील
संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या प्रतिनियुक्तीबाबत शासन परिपत्रक
क्रमांक संकीर्ण - २०२४ / प्र. क्र. ५४ /
सेवा-४, दि. २८ जून २०२४ रोजी
काढण्यात आले. यात नमूद करण्यात
आले आहे की, महाराष्ट्र शासकीय
कर्मचाऱ्याच्या बदल्यांचे विनियमन
आणि शासकीय कर्तव्ये पार पाडतांना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ नुसार शासकीय कर्मचाऱ्यांच्या
बदल्या करण्यात आल्यानंतरच कर्मचाऱ्यांना बदलीच्या जबाबदारी
संबंधीत नियुक्ती प्राधिकारी यांची
राहिल. बदली झालेल्या कर्मचाऱ्याचे उसनवारी अथवा प्रतिनियुक्तीचे आदेश काढण्यात येऊ नयेत, अशी कृती
केल्यास संबंधित नियुक्ती प्राधिकारी जबाबदार राहतील व त्यांचेवर नियम
कानुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात
येईल, याची नोंद घ्यावी.बदली झालेल्या कर्मचाऱ्याने पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू अथवा राजकीय दबाव आणल्यास होण्यास टाळाटाळ
संबंधित कर्मचाऱ्यावर नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी.
नांदेड जिल्ह्यातील अधीक्षक अभियंता
कार्यालयातील वरिष्ठ लिपीक धावडे,
पवार, साले, नांदेड विभागातील
लिपीक ढगे यांच्या सारखे अनेक
कर्मचारी बदलीच्या ठिकाणी रुजू न
होता आहे त्याच जागेवर ठाण मांडून
बसल्याने शासनाने याची गांभीर्याने
दखल घेतली असून केवळ यांच्यासाठी
जी. आर. (परिपत्रक) काढल्याचे
बोलल्या जात आहे. वरिष्ठस्तरावर
काय कारवाई होईल याकडे सर्वांचे
लक्ष लागले आहे.

टिप्पण्या