प्रा.भरांडे यांच्या उपोषणास चिखलीकरांची भेट!

 

नांदेड-लोकस्वराज्य आंदोलन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.रामचंद्र भरांडे यांनी अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कायार्र्लयासमोर सुरु केलेल्या अमरण उपोषणाचा आज 9 वा दिवस आहे. भर पावसात प्रा.भरांडे यांच्या उपोषास भाजपाचे नेते माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी उपोषणस्थळास भेट देवून प्रा.भरांडे यांच्या प्रकृतीची अस्थेवाईकपणे चौकशी  केली. मंत्री शंभूराज देसाई यांच्याशी संपर्क साधून प्रा.भरांडे यांची तब्येत खालवत चालली असल्याचे निदर्शनास आणून देवून त्यांच्या मागणीची दखल घेण्याची विनंती केली.

अनुसूचीत जाती आरक्षण वर्गीकरणासह जिल्ह्यातील मागासवर्गीय स्मशानभूमीच्या प्रश्‍नासाठी प्रा.रामचंद्र भरांडे हे गेल्या 1 जुलैपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषणास सुरुवात केली आहे. त्यांच्या उपोषणाचा आज 9 वा दिवस असतानाही जिल्ह प्रशासनाने दखल घेतली नाही. उपोषणकर्ते प्रा.भरांडे यांची तब्येत खालावत चालली असल्याची माहिती कळताच माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी भरपावसात उपोषणस्थळास भेट देवून संबंधित मंत्र्यांशी बोलण्याचे प्रा.भरांडे यांना आश्‍वासन दिले.

प्रा.भरांडे यांच्या एका शिष्टमंडळासमवेत निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडजकर यांची भेट घेवून मागासवर्गीय स्मशानभूमीचा प्रश्‍न तात्काळ मार्गी लावण्याची विनंती केली. तातडीने स्मशानभूमीचा प्रश्‍न निकाली काढून स्मशानभूमी जमीनीचा फेरफार करुन देण्याचे आश्‍वासन निवासी उपजिल्हाधिकार्‍यांनी यावेळी दिले.

जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्याशी संपर्क साधून जिल्हाधिकारी कार्यालयात वरिष्ठ अधिकार्‍यांना पाठविण्याची विनंती केली.तातडीने इतवारा ग्रामीण विभागाचे पोलिस उपविभागीय अधिकारी सुशीलकुमार नाईक यांना पाचारण केले. अर्धापूर पोलिस ठाण्याच्या अंतर्गत एका मुलाचा संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा तपास लावण्यास पोलिसांनी टाळाटाळ केल्यामुळे मयताच्या आईने गेल्या दीड महिन्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसली आहे. बेपत्ता एका अल्पवयीन मुलीचा शोध लावण्यास दिरंगाई होत असल्यामुळे तिच्या आईने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसली आहे. तरुणाचा संशास्पद मृत्यू प्रकरणात तातडीने कारवाई करुन बेपत्ता अल्पवयीन मुलीचा शोध घेण्याचे आश्‍वासन डीवायएसपी नाईक यांनी चिखलीकरासमक्ष आश्‍वासन दिले.

अनुसूचित जाती प्रवर्गात विशिष्ट अशा काही घटकांचाच सर्वांगीण विकास झाला आहे. त्यामुळे उर्वरित घटकांचा विकास होण्यास बाधा येत असल्याने अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये अ ब क ड असे वर्गीकरण करण्यात यावे. त्यानुसार त्या त्या जातीचा त्यात समावेश करावा या मागणीसाठी लोकस्वराज्य आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामचंद्र भरांडे यांनी नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या नऊ दिवसापासून आमरण उपोषण सुरू केले आहे.

माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यासोबत यावेळी    प्रविण साले , श्रावण पाटील भिलवंडे, सचिन उमरेकर ,बाळु खोमणे,बंडु वडजे , सुभाष गायकवाड, संदिप पावडे,उपोषण करणारे शिष्टमंडळासह रावसाहेब पवार,व्हि जी,डोईवाड, दत्तराज गायकवाड, सतिष कावडे, परमेश्वर बंडेवार, गणपत रेडी, अर्जुन गायकवाड, नामेवार सर,भारत खडसे,गणेश तांदलापुरकर ,प्रितम गवाले, लालबा घाटे, गंगाधर गायकवाड, देविदास इंगळे, आदी शिष्टमंडळ उपस्थित होते.

टिप्पण्या