नांदेड, दि. 28 ः नांदेड येथील नौनिहालसिंघ जहागीरदार यांच्या नेतृत्वाखालील नवज्योत फाऊंडेशनचे गेल्या अठरा वर्षापासून चालणारे संस्कार शिबिर व अन्य उपक्रम म्हणजे एक प्रकारचे व्रतच आहे, असे प्रतिपादन अभिनव भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब पांडे यांनी केले.
नवज्योत फाऊंडेशनच्या सोळाव्या वार्षिक चार दिवसीय संस्कार शिबिराचे रविवारी, दि. 28 रोजी कुसुम सभागृह येथे उद्घाटन झाले. यावेळी अध्यक्षस्थानावरुन पांडे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा शिबिराचे संयोजक नौनिहालसिंघ जहागीरदार, अभिनव भारत शिक्षण संस्थेचे कोशाध्यक्ष कैलाश काला, सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे माजी अधीक्षक रणजितसिंघ चिरागीया, चिरंजीलाल दागडीया, सायन्स कॉलेजचे प्राचार्य गवई, प्राचार्य जाधव, सायन्स कॉलेज विद्यार्थी समिती अध्यक्ष प्रदीप नागापूरकर, कामठा बु. येथील बसवेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव शंकर कंगारे, मनजितसिंघ सिद्धू, खालसा आयटीआयचे प्राचार्य गुरुबचनसिंघ, प्रा. लक्ष्मण शिंदे, मुख्याध्यापक नितीन सेलमोकर, सचिन पवार हे स्थानापन्न झाले होते.
बाळासाहेब पांडे पुढे म्हणाले की, सध्याच्या काळात कधी नव्हे एवढी संस्कारांची गरज निर्माण झाली आहे. म्हणून हे संस्कार शिबिर महत्वाचे आहे. आपण व्यक्ती म्हणून समाजात जगताना, समाजाला काही तरी देणे लागतो. प्रत्येकाने आपापल्या परीने जमेल ते समाजाला दिले पाहिजे. सामाजिक काम करण्यासाठी अनेक संस्था, संघटना, फाऊंडेशन्स निघतात. पण दोन -पाच वर्षे काम केल्यावर त्यांचे काम थंडावते, असा आपल्याला अनुभव येतो. सातत्याने एखादे काम करणे हे खरोखरीच कठीण आहे.
पण नौनिहालसिंघ जहागीरदार यांच्या नेतृत्वाखालील नवज्योत फाऊंडेशनचे दरवर्षी संस्कार शिबिर, रक्तदान शिबिर, विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा हे कार्य गेल्या अठरा वर्षापासून अव्याहत चालू आहे. एवढा प्रदीर्घ काळ सेवाभावी कार्य चालू ठेवणे हे एक व्रतच आहे, अशा शब्दात बाळासाहेब पांडे यांनी जहागीरदार यांच्या कार्याचे व शिबिराचे कौतुक केले. त्यांना शाबासकीची थाप दिली. तसेच जहागीरदार व त्यांचे अनेक सहकारी हे आमच्या एनएसबी कॉलेजचे माजी विद्यार्थी आहेत, याचा पांडे यांनी अभिमानाने उल्लेख केला.
जहागीरदार यांचे चार दशकापासूनचे सहकारी तथा गुरुद्वारा बोर्डाचे माजी अधीक्षक रणजितसिंघ चिरागीया यांनी चार दशकापूर्वीच्या शिख युवक सेवा संघ, शिख समाजात सामूहिक विवाह मेळावा सुरु करणे या कार्यांचा आवर्जून उल्लेख केला. तसेच प्रत्येकाच्या जीवनात संघर्ष असला पाहिजे. संघर्षानंतर मिळालेले यश हे कायमस्वरुपी असते. तर विनासंघर्ष मिळालेले यश कालांतराने फिके पडते, असे त्यांनी सांगितले.
नवज्योत फाऊंडेशन या संस्थेने आम्हाला सामाजिक संस्कार दिले आहेत. त्याच संस्कारांनी आम्ही सर्वजण वाटचाल करतो. तसेच आपल्या सर्वांच्या जीवनात देशाचे स्थान सर्वप्रथम असले पाहिजे, असेही चिरागीया म्हणाले.
या प्रसंगी कैलाश काला यांचे शुभेच्छापर भाषण झाले. या उद्घाटन सत्राचे प्रास्ताविक नवज्योतसिंघ जहागीरदार यांनी केले. तर सूत्रसंचालन शिक्षिका सौ. प्रफुल्लता फुलारी, सौ, श्रद्धा सावले यांनी केले. यावेळी सौ. स्वाती चौधरी यांनी स्वागतगीत गायिले. तर आभारप्रदर्शन नवज्योत फाऊंडेशनचे कोशाध्यक्ष सज्जनसिंघ सिद्धू यांनी केले. समारोपाचे वेळी क्वीझमधील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.
.............................. ...........................
chakot
आवड व इच्छाशक्ती असली तर करीयर उत्तम बनते
वेदांत देशमुख
ः कोणत्याही व्यक्तीमध्ये आवड व इच्छाशक्ती जबरदस्त असली तरच त्याचे करीयर उत्तम बनते, असे प्रतिपादन एन्स्पायर अॅकॅडमीचे संचालक तथा करीयर मार्गदर्शक वेदांत दीपक देशमुख यांनी केले.
नांदेड येथील नवज्योत फाऊंडेशनच्या संस्कार शिबिरात ते करीयर गाईडन्स या विषयावर बोलत होते. हा कार्यक्रम कुसुम सभागृह येथे रविवारी सकाळी झाला. आपले करीयर म्हणजे उत्तम भविष्य घडवण्यासाठी आपल्याला एखाद्या विषयाची, कामाची जबरदस्त आवड पाहिजे. तसे काम करण्याची, अभ्यास करण्याची इच्छाशक्ती पाहिजे. आणि स्ट्राँग ऑब्जेक्टीव्ह पाहिजे. असे असेल तर आपले करीयर उत्तम घडू शकते.
यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी भाग घेतला. व प्रश्नांना उत्तरे दिली. या सत्राचे सूत्रसंचालन कुल प्रकाश सिंग लिखारी, सौ, श्रद्धा सावले. सौ, प्रफुल्लता फुलारी.कु, सोनाली केंद्रे. यांनी केले.

addComments
टिप्पणी पोस्ट करा