तब्बल ३८ दिवस चोवीस तास कार्यालयात मुक्काम ठोकणाऱ्या धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांचा भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार

खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन झाल्या पासून मतदान संपल्याच्या दुसऱ्या दिवसापर्यंत तब्बल ३८ दिवस चोवीस तास कार्यालयात मुक्काम ठोकणाऱ्या धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांचा भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केल्यानंतर  ठाकूर यांनी आपला बाढबिस्तारा स्वतःच्या घरी हलविला.


भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार चिखलीकर यांच्या 

प्रचार कार्यालयाचे प्रमुख म्हणून दिलीप ठाकूर यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली होती.२०१९ च्या निवडणुकीत देखील दिलीप ठाकूर यांनी खा.चिखलीकर यांच्या कार्यालयाचे व्यवस्थापन सांभाळले होते.  निवडणुकीच्या दरम्यान कार्यालयात आलेल्या प्रत्येक मतदारांची, पदाधिकाऱ्यांची आस्थेने चौकशी केल्यानंतर ठाकूर यांनी त्यांचे काम मार्गी लावले. आपल्या पस्तीस वर्षाच्या अनुभवातून प्रचाराचे नियोजन करत असताना येणाऱ्या अडचणीतून मार्ग काढण्यात दिलीपभाऊ यांना यश आले.जगातील सर्वात लोकप्रिय नेते तथा भारताचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांच्या नांदेड येथील विराट जाहीर सभेनंतर भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी आपला परिचय देताना असे सांगितले की, "आपण पुन्हा एकदा पंतप्रधान व्हावे यासाठी एक महिन्यापासून प्रचार कार्यालयात दररोज चोवीस तास मुक्काम करून सेवा देत  आहे." यावर पंतप्रधान यांनी  स्मितहास्य करून प्रतिसाद दिला होता. ३८ दिवस कार्यालयात मुक्काम केल्यानंतर त्यांना निरोप देताना प्रवीण पाटील चिखलीकर यांनी असे सांगितले की, दिलीपभाऊ आपल्या कार्याला नमन आहे. भाजपा महिला मोर्चा प्रदेश कार्यकारणी उपाध्यक्षा प्रणिताताई देवरे यांनी देखील दिलीप भाऊंच्या अथक परिश्रमाचे कौतुक करून आभार मानले. निरोपाच्या वेळी विनायक सगर, अमोल कदम, साहेबराव गायकवाड, सुरेश लोट, सुनील पाटील, संदीप कराळे, मारोतराव जाधव यांनी दिलीपभाऊंचा पुष्पहार देऊन सन्मान केला.  आपल्या सोबत कार्यालयात काम करणारे राजेंद्र जाधव, सुनील रामदासी, अनिलसिंह हजारी, रमेश पांडे,कन्हैयासिंह काथी, प्रकाश उंटवाले, धुतमल सर, फुलारी सर, बबलू यादव ,ओमप्रकाश तापडिया, सरदार रुपेंद्रसिंह साहू, अनिल सावंत, विलास जोगदंड, श्रीपाद हराळे, रोहन येडगे, गणेश गादेवार, संतोष आंबटवार, अक्षय सोनसाळे यांच्या सहकार्यामुळेच कार्यालयीन काम मार्गी लागले असे दिलीपभाऊंनी यावेळी आवर्जून सांगितले.

जिल्हाध्यक्ष ॲड. किशोर देशमुख यांनी असे सांगितले की, दिलीपभाऊ सारखे काम जर प्रत्येक भाजप पदाधिकाऱ्यांनी केले तर भाजपची सत्ता कोणीही काढू शकत नाही. निरोप समारंभा नंतर दिलीप ठाकूर हे आपल्या सुटकेससह घरी गेले. अडतीस दिवस अखंड सेवा दिल्याबद्दल दिलीप ठाकूर यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या