'यशवंत 'मध्ये दोन दिवसीय विद्याशाखा विकास कार्यक्रम उत्साहात संपन्न*

नांदेड:(दि.२२ एप्रिल २०२४)

          श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार इलेक्ट्रॉनिक्स विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीने 'आय.क्यू. ए.सी.इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट सिस्टीम फॉर फॅकल्टी परफॉर्मन्स अप्रायझल रेकॉर्ड: आयआयएमएस:२०२४' या विषयावर दि.१९ व २० एप्रिल रोजी दोन दिवसीय विद्याशाखा विकास कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

           या प्रात्यक्षिक प्रशिक्षण कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांनी भूषविले. प्रशिक्षणाचे साधन व्यक्ती इलेक्ट्रॉनिक्स विभागप्रमुख डॉ.प्रवीणकुमार मिरकुटे आणि पर्यावरणशास्त्र विभागप्रमुख डॉ.बतुल्ला बालाजीराव होते.

           इलेक्ट्रॉनिक्स विभागात संपन्न झालेल्या या प्रशिक्षणात निमंत्रक व मुख्य आयोजक प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे, उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे तथा डॉ.हरिश्चंद्र पतंगे, संघटक सचिव डॉ. प्रवीणकुमार मिरकुटे व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयिका डॉ.एल.व्ही. पदमाराणी राव, डॉ.एम.एम.व्ही.बेग आणि डॉ.नीरज पांडे यांची आवर्जून उपस्थिती होती.

           या कार्यक्रमात आयआयएमएस ची ओळख पीबीएएस चे प्रत्यक्ष प्रशिक्षण, सर्वसामान्य माहिती आणि शैक्षणिक पार्श्वभूमी, मूल्यांकन निकष आणि विद्यापीठीय व महाविद्यालयीन प्राध्यापकांसाठी पद्धतीशास्त्र तसेच संशोधकीय आणि शैक्षणिक योगदान या विषयावर उपस्थितांना सविस्तर व सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

           या प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष सदस्य डॉ. श्रीरंग बोडके, डॉ.वनदेव बोरकर, डॉ. संभाजी वर्ताळे, डॉ.अजय गव्हाणे, डॉ. नीरज पांडे, डॉ.एम.एम.व्ही.बेग,डॉ. संजय ननवरे, डॉ.हरिश्चंद्र पतंगे, डॉ. अजय मुठे, डॉ.बतुल्ला बालाजीराव, ग्रंथपाल डॉ.कैलास वडजे, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील आदींनी सहकार्य केले.

           या प्रशिक्षण कार्यशाळेत प्रा.राजश्री जी.भोपाळे, डॉ.रत्नमाला म्हस्के, प्रा.भारती सुवर्णकार,डॉ. सरिता वानखेडे, प्रा.प्रियंका सिसोदिया,डॉ. प्रवीण तामसेकर, डॉ.साईनाथ बिंदगे, डॉ.मोहम्मद आमेर,डॉ.शिवाजी सूर्यवंशी, डॉ.श्रीकांत जाधव, डॉ. मदन अंभोरे, प्रा. माधव वडजे, डॉ. डी.एस. कवळे, प्रा.नारायण गव्हाणे, डॉ. राजरत्न सोनटक्के, प्रा. ए.आर. गुरखुदे आदींसह इतर प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी प्रशिक्षित झाले.

टिप्पण्या
Popular posts
बंधुत्व फाउंडेशनतर्फे सुरक्षा रक्षक सागर जाधव यांचा प्रामाणिकपणाबद्दल सत्कार*
इमेज
मुंबई पोर्ट ट्रस्टमधील सामाजिक कार्यकर्ते सतीश तुपे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार*
इमेज
नांदेड जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना (जुक्टा) कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा जाहीर सत्कार
इमेज
तब्बल ३८ दिवस चोवीस तास कार्यालयात मुक्काम ठोकणाऱ्या धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांचा भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार
इमेज
23 उमेदवारांचे भवितव्य 4 जून पर्यंत मतयंत्रात बंद निरीक्षकांच्या उपस्थितीत सर्व पेटया स्ट्राँग रूममध्ये*
इमेज