तरुणाईचा मतदानातील टक्का वाढीसाठी सायन्स कॉलेजचा अभिनव उपक्रम संपन्न*


दि 20 एप्रिल रोजी सकाळी मतदान जनजागृती अभियान अंतर्गत नांदेडच्या सायन्स कॉलेजमध्ये अभिनव उपक्रम राबवित सेल्फी पॉईंट च्या माद्यमातून आयोजित केले.या कार्यक्रमातून मतदान जनजागृती करण्यात आली. यावेळी नांदेड चे शिक्षण अधिकारी दिलीप बनसोडे यांच्या प्रमुख हस्ते सेल्फी पॉईंट चे अनावरण करण्यात आले. दिलीप बनसोडे यांनी नवमतदारासोबतच मतदाराला आव्हान करीत आपल्या आई वडिलांना वा नातेवाईक यांना मतदान करण्यास भाग पाडावे तसेच मतदाराने मतदानच्या दिवशी घरी किंवा बाहेरगावी फिरायला न जाता मतदान न चुकता करावे व लोकशाहीला मतदान च्या मार्गातून सशक्त करावे असे मार्गदर्शन केले. याप्रसंगी संस्थेचे सचिव सौ श्यामल पत्की यांनी मतदान करतांना आपल्या जवळचे सोयरे धायरे जातीपती च्या पुढे जाऊन मतदान करायला पाहिजेत असे विचार व्यक्त केले. प्राचार्य प्रो डॉ डी यु गवई सर यांनी प्रास्तविक करतांना उमेदवार हा देशाच्या विकासासाठी वा आपल्या प्रश्नाकरिता जागरूक असला पाहिजे अस्याच उमेदवाराला मतदान करायला पाहिजेत. जगातील सर्वात मोठया असलेल्या लोकशाही ला जर टिकवायचे असेल तर मतदानची टक्केवारी वाढवली पाहिजे असे विचार प्रस्तुत केले. 70-90%पर्यंत मतदान झाले पाहिजेत. प्रत्येक नागरिकांनी मतदान करण्याचे नागरी कर्तव्य बजावले पाहिजे. असे मत संस्थेचे व कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी खासदार डॉ वेंकटेश काब्दे यांनी अध्यक्षीय समारोप प्रसंगी मार्गदर्शन केले. यावेळी मंचावर महाविद्यालय विकास समिती चे अध्यक्ष मा. दिपनाथ पत्की यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजक प्रा एकनाथ खिल्लारे व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी तसेच उप प्राचार्य प्रो डॉ सौ अरुणा राजेंद्र शुक्ला उपस्थित होते.  उपप्राचार्य प्रो डॉ लक्ष्मण शिंदे यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले व आभार प्रदर्शन प्रा एकनाथ खिल्लारे यांनी केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉ बालाजी कोम्पलवार, डॉ किरण चिद्रावार सह अनेक प्राद्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यश्ववीतेसाठी दिलीप कापुरे, शंकर पतंगे व राहुल साळवे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमात उपस्थित राहून  सहभागी झालेल्यांनी सेल्फी पाँइंट वर सेल्फी काढून मतदान जनजागृती के।

टिप्पण्या