नांदेड- श्री शारदा भवन शिक्षण संस्था संचलित कै. कुसुमताई शंकरराव चव्हाण यशवंत महाविद्यालय सेवकांची पत संस्था अध्यक्षपदी प्रा डॉ संभाजी वर्ताळे यांची दुसऱ्यांदा तर सचिव पदी श्री शिवाजी मद्देवाड यांची बिनविरोध निवड झाली आहे.
कै. सौ.कुसुमताई शंकरराव चव्हाण यशवंत महाविद्यालय सेवकांची पत संस्था संचालक मंडळ ची बैठक 10.30 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी श्री संजय जळके यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडण्यात आली त्यांचे आव्हाना नुसार ज्यांना फॉर्म भरायचा असेल त्यांनी फॉर्म भरू शकता असे सांगितले पण सर्व संचालक मंडळाच्या मतानुसार अध्यक्षपदी प्रा. डॉ. श्री संभाजी वर्ताळे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली उपाध्यक्षपदी प्रा. चंद्रभानू कोत्तावार तर सचिव पदी श्री शिवाजी मद्देवाड आणि कोषाध्यक्षपदी श्री राजीव भोसले यांची निवड करण्यात आली या निवडणुकीत प्रा डॉ बालाजी भोसले, प्रा डॉ विरभद्र स्वामी, डॉ मधुकर बोरसे, श्री प्रकाश देशमुख, श्री ओमप्रकाश आळणे, श्रीमती रुद्रावती चव्हाण, श्री राजू वावले, श्री भगवान जाधव हे संचालक उपस्थित होते ही निवड सर्वानुमते झालेली आहे निवड होताच निव डणुक अधिकारी श्री संजय जळके यांनी स्वागत केले.ही निवड होताच प्रबंधक श्री संदीप पाटील, प्रा डॉ दाड, प्रा डॉ मधुकर वाघ, प्रा डॉ सचिन कदम तसेच कार्यालयीन कर्मचारी देविदास पवार, साई पवार, विष्णू जोगदंड यांनी स्वागत केले.

addComments
टिप्पणी पोस्ट करा