मुंबई पोर्ट ट्रस्टमधील सामाजिक कार्यकर्ते सतीश तुपे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार*

मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता खात्यातील इलेक्ट्रिक सेक्शनचे चार्जमन, मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे मॅनेजिंग कमिटी मेंबर व धडाडीचे कार्यकर्ते  सतीश शंकर तुपे हे मुंबई पोर्ट ट्रस्टमधून ३५ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर ३० एप्रिल २०२४  पासून सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्त वर्कशॉपमधील कामगारांनी  माझगाव येथील वर्कशॉपमध्ये सतीश तुपे  व  पत्नी श्रद्धा तुपे यांचा  २६ एप्रिल २०२४ रोजी शाल, श्रीफळ,  पुष्पगुच्छ  व भेटवस्तू देऊन जाहीर सत्कार केला. त्याचप्रमाणे मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन, विविध खात्यातील कामगार, नातेवाईक, माझगाव डॉक, फ्लोटीला वर्कशॉप यांच्यावतीने सतीश तुपे यांचा सत्कार करण्यात आला.

सतीश तुपे हे प्रामाणिक, आदर्श व निष्ठावंत सामाजिक कार्यकर्ते आहेत.  युनियनच्या प्रत्येक आंदोलनात ते नेहमी अग्रभागी होते. त्यांनी कामगारांचे दैनंदिन प्रश्न, हॉस्पिटलला मदत, पेन्शन असे अनेक  प्रश्न पाठपुरावा करून यशस्वीपणे सोडविले. त्यांना उदंड आयुष्य आणि चांगले आरोग्य लाभो,  तसेच त्यांच्याकडून यापुढेही कामगारांची चांगली सेवा घडो. अशी शुभेच्छापर भाषणे मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे  पदाधिकारी सुधाकर अपराज, विद्याधर राणे, दत्ता खेसे, विजय रणदिवे, विकास नलावडे, निसार युनूस, मारुती विश्वासराव,  विजय पंदीरकर,  आप्पा सूर्यवंशी, पोर्ट ट्रस्टचे  विद्युत अभियंता राजेश वाधवाणी,  सहाय्यक विद्युत अभियंता इकबाल बामणे, दत्तात्रेय सुगवेकर, संध्या सुगवेकर, स्मिता चंदने आदी मान्यवरांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युनियनचे कमिटी मेंबर  श्रीकृष्ण पडेलकर यांनी केले. कार्यक्रमास मुलगी मधुरा तुपे व मुलगा साईराज तुपे उपस्थित होते. सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम  यशस्वी करण्यासाठी विष्णू पोळ, योगेश चौले, विजय बामगुडे,  सुनील गायकर,  नितीन रायकर,  नारायण पालव,  मेलविन डिसोझा,  संजय आरगडे,  रिझवान शेख,  श्रीकृष्ण पास्ते,  राजेश वाडेकर,  जावेद सोलकर,  टी. एलांगोवन, वाघमारे आदी कामगार कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

आपला

मारुती विश्वासराव 

प्रसिद्धी प्रमुख 

मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन

टिप्पण्या