_वडमुरंबी येथे गुढीपाडवा नववर्ष निमित्‍त पंचाग नुसार माहिती_*

    देवणी तालुक्‍यातील वडमुरंबी हणुमान मंदीर प्रांगणामध्‍ये प्रतिवर्षाप्रमाणे गुढीपाडवा मराठी नववर्षाच्‍या शुभ मुहर्तावर चैत्र मास शुक्‍ल पक्ष प्रतिपदा म्‍हणुन नव वर्षाची सुरूवात होते ९ एप्रील मंगळवार रोजी वडमुरंबी ग्रामस्‍थांचे श्रध्‍दास्‍थान अकरावा रूद्र अवातर जय बजरंगबली हणुमान मंदीर मध्‍ये भाविक भक्‍तांच्‍या वतीने महारूद्र अभिषेक हणुमान चालीसा पठण पुजा पाठ विधी  सोहळा आयोजित करण्‍यात आला. 

ग्रामीण परिसरामध्‍ये शेतक-यांचा गुढीपाडवा नववर्ष म्‍हणुन खुप महत्‍व समजला जातो. आणि आनंदाच्‍या उत्‍साहात घरोघरी गुढी उभारून सर्वजन आनंदाने गुढीपाडवा नववर्षाच्‍या एकमेकास गाठी भेटी करित आनंदाच्‍या उत्‍साहात स्‍वागत करित शुभेच्‍छा दिल्‍या. 

     तसेच या नववर्ष गुढी पाडव्‍याच्‍या शुभ अमृत मुहुर्तावर फार पुर्वीच्‍या काळापासुन परंपरागत चालत आलेल्‍या पुर्वजांचा वारसा जोपासत आजच्‍या या आधुनिक काळामध्‍ये पण गुढीपाडव्‍याच्‍या मराठी नववर्षा निमित्‍त ऐतिहासिक महत्‍व देत गावातील सर्व ग्रामस्थ व शेतकरी आणि व्‍यापारी तसेच विविध क्षेत्रामध्‍ये उदयोग व्‍यवसाय करणारे सर्व समाज एकोप्‍याच्‍या भावनेतुन पुर्वजांच्‍या मार्गदर्शनावर मार्गक्रमण करित हाणुमान मंदीराच्‍या प्रागंणामध्‍ये सांयकाठी ठिक ५..०० वाजता एकत्र येतात. शेतकरी मात्र चालु वर्ष कसे जाणार यंदा मेघराजा निवास कोणावर आहे. आणि पावसाच्‍या सरासरी अंदाज व ए‍कंदरीत पाऊसाचे नक्षत्र आणि पाऊस हवामान कसा असणार आहे. खरीप व रब्‍बी पेरणी सरासरी केव्‍हा आणि कोणत्‍या नक्षत्रावर सुरूवात होणार तसेच यंदा कोणते धान्‍य मुबलक पिकण्‍यासाठी हा वर्ष अुनकुल कसा असणार आहे. याबद्दलची माहिती जाणुन घेण्‍यासाठी नववर्षाच्‍या पंचाग आधारे पाहण्‍याची हि पंरपरा कायम जोपासत असलेली प्रथा आजतागायत वडमुरंबी व ग्रामीण भागात पाहवयास मिळते. नववर्षाच्‍या शुभमुहर्तावर पंचागदाते कर्नाटक सीमालगत असलेले वडमुरंबी गावातील जेष्‍ठ समाजप्रबोधनकार नामवंत महादेवराय मुर्गेप्‍पा महाराज यांच्‍या वतीने सर्वांना माहिती पंचागाच्‍या आधारे एकंदरीत पावासासंबधी व नक्षत्राबद्दल माहिती देण्‍याची सेवा करण्‍याचे कार्य महाराजांच्‍या हस्‍ते पार पाडले.

टिप्पण्या