*कामगार विरोधी 'बीजेपी' सरकारला* *लोकसभा निवडणुकीत कामगारवर्ग धडा शिकविल!

 

मुंबई १० : संसदेत "फोर कोड बिल"संमत करून कामगार वर्गाचे खच्चीकरण करणा-या 'बीजेपी' सरकार आणि त्या सरकारची पाठराखण करणा-या महायुतीला येत्या लोकसभा निवडणुकीत मतदान न करता आपला निषेध नोंदवतील आणि महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणतील,असा निर्धार राष्ट्रीय मिल मजदूर संघांच्या संयुक्त प्रतिनिधी मंडळाने एका ठरावाद्वारे व्यक्त केला आहे.अध्यक्षस्थानी अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर होते.सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी सभेत ठराव मांडला. 

    १८ व्या लोकसभेसाठी महाराष्ट्रात २० मे रोजी मतदान होत आहे.या निवड णुकीत,बंद एनटीसी मिल चालू न करता कामगारांवर उपासमारीची वेळ आणणा-या,केंद्र आणि महाआघाडी युतीला या लोकसभा निवडणुकीत कामगार वर्ग चांगलाच धडा शिकविल,असा ठराव‌ करून‌‌ म्हटले आहे, माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वा खालील महाविकास आघाडी सरकारने वरील कामगार विरोधी "फोर कोड बीला" ची महाराष्ट्रात अंमलबजावणी न करण्याचा निर्णय घेतला होता.परंतु महायुतीचे सरकार मात्र कामगार वर्गावर कु-हाड चालविण्यास निघाले आहे.तेव्हा येत्या लोकसभा निवडणुकीत रा.मि.म.संघाच्या संयुक्त प्रतिनिधी मंडळाने महाविकास आघाडीच्या 

उबाठा शिवसेना,

राष्ट्रवादी,कॉंग्रेस आदी सहयोगी पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्याचा निर्णय घेतला आहे.खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष रघुनाथ (आण्णा) शिर्सेकर, बजरंग चव्हाण, सुनिल बोरकर,सेक्रेटरी शिवाजी काळे आदींची ठरावाला पाठिंबा देणारी भाषणे झाली.मुबईतील महाविकास आघाडीघ्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी संघटनेच्या वतीने पदाधिका-यांच्या नेतृत्वाखाली एक निवडणूक प्रचार समिती गठीत करण्यात आली आहे.

टिप्पण्या
Popular posts
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
इमेज
सेलूतील नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची विमानवारी उत्तरभारत सहलीद्वारे गिरवले शिस्त, स्वावलंबनाचे धडे
इमेज
हैदराबादच्या भारतीय कला महोत्सवात डॉ. सुरेश सावंत यांची प्रकट मुलाखत
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
पं. जवाहरलाल नेहरू यांना बालकवितांनी अभिवादन
इमेज