आदिवासीच देशाचे खरे मालक; जल, जंगल, जमीन हा हक्क काँग्रेस अबाधित ठेवणार : राहुल गांधी(video)

*आदिवासी, दलित, मागास समाजावरील अन्याय दूर करुन न्याय देण्यासाठी भारत जोडो न्याय यात्रा.* *देशातील २२ उद्योगपतींना १६ लाख कोटींची कर्जमाफी प...

*आदिवासी, दलित, मागास समाजावरील अन्याय दूर करुन न्याय देण्यासाठी भारत जोडो न्याय यात्रा.*

*देशातील २२ उद्योगपतींना १६ लाख कोटींची कर्जमाफी परंतु आदिवासी, गरिबांचा एक रुपयाही माफ नाही.*

*महाराष्ट्रात खोके-बोके यांचे भ्रष्ट सरकार; भाजपाने ज्यांच्यावर भ्रष्टाचारांचे आरोप केले त्यांचाच सत्तेत सहभाग - नाना पटोले*

*राहुलजींच्या नेतृत्वाखाली केंद्रात व राज्यात काँग्रेसची सत्ता आणायची आहे : बाळासाहेब थोरात*

*राहुलजी गांधींच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रेचे नंदूरबारमध्ये जल्लोषात स्वागत.*

नंदुरबार/मुंबई, दि. १२ मार्च

आदिवासी हे देशाचे खरे मालक आहेत, या देशातील जल, जंगल व जमीनीवर पहिला हक्क आदिवासींचा आहे परंतु भारतीय जनता पक्ष आदिवासींना वनवासी म्हणून हक्कापासून वंचित ठेवत आहे. भाजपा सरकार दलित, आदिवासींची जमीन ताब्यात घेऊन अदानीला देत आहे. आदिवासांचे हक्क हिरावून घेतले जात आहेत परंतु काँग्रेस पक्ष आदिवासींच्या हक्काचे रक्षण करणारा आहे. देशात आदिवासींची ८ टक्के लोकसंख्या आहे, पण त्याप्रमाणात सत्तेत भागिदारी नाही. काँग्रेस सत्तेत आल्यानंतर हे चित्र बदलणार व ज्यांची जेवढी लोकसंख्या तेवढाच हक्क दिला जाईल. आदिवासींचे, जल, जंगल, जमीन हक्क अबाधित ठेवणार, असे आश्वासन खासदार राहुलजी गांधी यांनी दिले आहे.

भारत जोडो न्याय यात्रेची महाराष्ट्रातील सुरुवात नंदूरबारमधून झाली. यावेळी राहुल गांधी यांनी होळीच्या सणाचा मान देण्यात आला होता, सभेला संबोधित करताना राहुलजी गांधी यांनी होळीच्या शुभेच्छा देत आदिवासी व वनवासी यातील फरक समजावून सांगितला, ते म्हणाले की, आधार कार्ड योजनेची सुरुवात युपीए सरकारने नंदूरबारमधून केली होती, यातून आदिवासींची ओळख स्पष्ट करणारा संदेश दिला होता. देशात आज २२ लोकांकडे जेवढी संपत्ती आहे तेवढी संपत्ती ७० कोटी लोकसंख्येकडे आहे, ही विषमता आहे.आदिवांसींची ८ टक्के लोकसंख्या आहे पण देशातील कोणत्याच क्षेत्रात आदिवासींची ८ टक्के भागिदारी नाही. युपीए सरकारने आणलेला जमीन अधिग्रहण कायदा भाजपा सरकारने कमजोर केला आहे, सत्तेत आल्यास पुन्हा हा कायदा मजबूत केला जाईल. जातनिहाय जनगणना केली जाईल, शेतमालाला एमएसपीचा कायदा लागू करणार,ज्या भागात आदिवासींची ५० टक्के लोकसंख्या आहे तेथील सर्व निर्णय घेण्याचा अधिकार आदिवासींना दिला जाईल, ६ व्या शेड्युलमध्ये त्याचा समावेश केले जाईल. मनरेगावर २४ वर्षात जेवढा खर्च केला जातो तेवढ्या रकमेचे म्हणजे तब्बल १६ लाख कोटींचे २२ उद्योगपतींचे कर्ज माफ केले पण आदिवासी, गरिबांचा एक रुपयाही माफ केला नाही. 

यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, १२ मार्च रोजी महात्मा गांधी यांनी जुलमी ब्रिटीश सत्तेविरोधात दांडी यात्रा काढली होती तसेच महाराष्ट्राचा मंगल कलश आणणारे यशवंतराव चव्हाण यांची जयंतीही आजच आहे आणि आदिवासींच्या होळीचा पहिला दिवस आहे, अशा या मंगलमय वातावरणात राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रेने छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांच्या पावन भूमीत आगमन झाले आहे. भाजपा सरकार आदिवासींवर अत्याचार करत आहे, महिलांवर अत्याचार करत आहे. मणिपूरमध्ये महिलांवर अत्याचार केला पण भाजपा सरकार डोळ्यावर पट्टी बांधून बसले आहे. जे सरकार महिलांवर अत्याचार करते त्यांची सत्ता रहात नाही हा इतिहास आहे. भाजपा ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करते त्यांनाच सत्तेत सहभागी करुन घेते, जलसंपदा विभागात घोटाळा झाला असे आरोप केले व त्यानांच सत्तेत आणून बसवले. आज महाराष्ट्रात खोके व बोके यांचे भ्रष्ट सरकार आहे. नंदूरबारमधून जेव्हा जेव्हा काँग्रेसचा खासदार निवडून येतो तेव्हा केंद्रात काँग्रेसचे सरकार येते. यावेळी नंदूरबारचा खासदार काँग्रेसचाच होईल व केंद्रात काँग्रेसची सत्ता येईल.


यावेळी विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, नंदूरबार हा काँग्रेस विचाराचा जिल्हा आहे, इंदिराजी गांधी, राजीवजी गांधी, सोनियाजी गांधी लोकसभेच्या प्रचाराचा नारळ नंदुबारमधूनच फोडत. नंदूरबारला मोठा इतिहासही आहे, १९४२ च्या आंदोलनात पहिले बलिदान नंदूरबार जिल्ह्याने दिले आहे. राहुलजी गांधी यांनी आधी ४००० किमी पदयात्रा काढली व आता भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून न्याय देण्याचा संकल्प घेऊन ते मणिपूरपासून मुंबईपर्यंत निघाले आहेत. आपल्याला आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात व केंद्रात काँग्रेसची सत्ता आणायची आहे, असे आवाहन थोरात यांनी केले. 

या सभेला प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मंत्री के. सी. पाडवी, काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य व खासदार चंद्रकांत हंडोरे, आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष शिवाजीराव मोघे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाचे अध्यक्ष जयराम रमेश, AICC चे सचिव आशिष दुवा, बीएम संदीप, रामकिसन ओझा, युवक काँग्रेसचे अध्यक्ष बी. व्ही श्रीनिवास, सेवादलाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालजी देसाई, प्रदेश कार्याध्यक्ष प्रणिती शिंदे, गुजरातचे प्रदेशाध्यक्ष खा. शक्तिसिंह गोहिल, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, मीडिया विभागाचे अध्यक्ष विशाल मुत्तेमवार, युवक काँग्रेसचे महाराष्ट्राचे अध्यक्ष कुणाल राऊत, माजी न्यायाधीश बी.जी. कोळसे पाटील, अनुसुचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबीरे, आदिवासी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी, प्रतिभा शिंदे, नंदूरबार जिल्हा काँग्रेस अध्यक्ष शिरिष नाईक आदी उपस्थित होते.

COMMENTS

[विशेष न्युज]

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel