कोन-पनवेल गिरणी कामगार समस्येवर २६ रोजी सचिन‌ अहिर यांनी बोलवली सभा!*

मुंबई दि.२२: एमएमआरडीच्या पनवेल-कोन येथील गिरणी कामगार घरांचे सेवा शुल्क म्हाडाने ४२ हजार रुपये आकारले असून या प्रश्ना वरून कामगार आणि वारसदारांमध्यें कमालीचा असंतोष पसरला आहे.या पार्श्वभूमीवर गुरुवारी कोन पनवेल गिरणी कामगार संकुल एकता समितीचे सदस्य डॉ.संतोष सावंत,रमेश मेस्त्री यांनी राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर यांची वाढदिवसाच्या औचित्याने परेलच्या महात्मा गांधी सभागृहात भेट घेतली.त्यांना शुभेच्छा देताना कोन रहिवाशांच्या समस्या कानावर घातल्या.सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्याही या समस्या कानावर घातल्या आहेत.कोन येथील गिरणी कामगार आणि वारसदार यांना संघटित करण्याकामी सहकार्य करणारे रामिम.संघाचे खजिनदार निवृत्ती देसाई, जनसंपर्क प्रमुख कथालेखक काशिनाथ माटलही त्या प्रसंगी उपस्थित होते.आमदार सचिन अहिर यांनी कोन रहिवाशी कामगारांची येत्या २६ रोजी दुपारी २.३० वाजता परेलच्या मनोहर फाळके सभागृहात मिटिंग बोलावली आहे.या मिटिंगमध्ये पुढील आंदोलनाचा निर्णय घेण्यात येणार आहे.आंदोलनासाठी पनवेल येथील शेकापची मदत घेण्यात येईल,असे सचिन अहिर यांनी कोन रहिवाशी समितीच्या शिष्टमंडळाला सांगितले आहे.तरी कामगार तसेच वारसदारांनी २६ तारीखेच्या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे समिती सदस्य डॉ.संतोष सावंत यांनी आवाहन केले आहे.

टिप्पण्या