'यशवंत ' मध्ये वैदिक गणितावर राष्ट्रीय वेबिनार उत्साहात संपन्न*

नांदेड:(दि.२४ मार्च २०२४)

          श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात इंग्रजी आणि गणित विभागाच्या वतीने दि. २३ मार्च रोजी आयोजित भारतीय ज्ञान पद्धती: वैदिक गणित या विषयावरील राष्ट्रीय वेबिनार उत्साहात संपन्न झाले.

           उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्षस्थान स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य, निमंत्रक व मुख्य आयोजक डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांनी भूषविले. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक गणिताच्या प्रोफेसर सौ.माधुरी भराडे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयीका, इंग्रजी विभागप्रमुख, संघटक सचिव डॉ.एल.व्ही.पदमाराणी राव, गणित विभागप्रमुख डॉ.नीरज पांडे यांची उपस्थिती होती.

            प्रारंभी प्रास्ताविकात डॉ.एल.व्ही. पदमाराणी राव यांनी वैदिक गणितावर राष्ट्रीय वेबिनार आयोजनामागील भूमिका विस्ताराने स्पष्ट केली.

           सौ.माधुरी भराडे यांनी, विविध गणितांची समीकरणे व प्रश्न वैदिक गणितीय पद्धतीच्या माध्यमातून अत्यंत सहज, सोप्या पद्धतीने सोडवून वैदिक गणित पद्धतीवर प्रभावी भाष्य केले.

            अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांनी, आधुनिक पिढीला वैदिक गणिताचे ज्ञान देणे काळाची गरज असल्याचे स्पष्ट केले तसेच  भारतीय ज्ञान हे सर्वश्रेष्ठ असून काळाच्या ओघात मानवी जीवन समृद्ध करणाऱ्या या ज्ञानाचा आपल्याला विसर पडत चालला आहे, याबद्दल खंत व्यक्त केली. पाणिनी, रामानुजम् यांचे गणित क्षेत्रातील योगदान अतुलनीय आहे, असेही सांगितले.

            कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रत्नमाला मस्के यांनी केले. प्रमुख अतिथींचा परिचय प्रा.माधव दुधाटे यांनी करून दिला आणि आभार डॉ.वनदेव बोरकर यांनी मानले.

          कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.अजय टेंगसे, डॉ.कैलास इंगोले, प्रा.माधव पुयड, प्रा.किरण देशमुख, प्रा.चेतन देशमुख, प्रा.सचिन वडजे, प्रा. नागेश पवार, प्रा.पूनम कदम, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने यांनी सहकार्य केले.

            एकूण २०० संशोधक, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी या वेबिनारचा लाभ घेतला.

           याप्रसंगी डॉ.वीरभद्र स्वामी, डॉ.साईनाथ शाहू, डॉ.अजय गव्हाणे, प्रा. बी.बी. कुलकर्णी, डॉ.साईनाथ बिंदगे आदींसह विविध विभागाचे विभागप्रमुख, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टिप्पण्या