*मुंबई बंदरातील स्थानिय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष मिलिंद घनकुटकर यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा संपन्न*


मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता खात्यातील ड्राफ्टमेन्स  व मुंबई पोर्ट प्राधिकरण स्थानिय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष आणि  कामगारांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढणारे झुंजार नेते मिलिंद घनगुटकर हे १  एप्रिल २०२४ पासून मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या ३५ वर्षाच्या प्रदीर्घ निष्कलंक सेवेनंतर निवृत्त होत असून,  त्यानिमित्ताने मुंबई पोर्ट प्राधिकरण स्थानिय लोकाधिकार समितीच्या वतीने २२ मार्च २०२४ रोजी भाऊचा धक्का येथे मिलिंद घनकुटकर यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते फेटा, शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा भव्य  सत्कार करण्यात आला.  

मुंबई बंदरात मिलिंद घनगुटकर यांनी मुंबई पोर्ट प्राधिकरण स्थानिय लोकाधिकार समितीच्या वतीने व आपल्या कार्यकर्त्यांच्या सहकाऱ्यांने शिवजयंती उत्सव, रक्तदान शिबिरे, करिअर मार्गदर्शन शिबिरे, मराठी भाषा दिन, नोकरी मधील बढती, कंत्राटी कामगारांना न्याय, रुग्णसेवा,  अशी अनेक प्रकारची विधायक कार्य, सामाजिक कार्य केली आहेत. मिलिंद घनकुटकर यांच्या सामाजिक व राजकीय कार्यावर आधारित मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे माजी चेअरमन व महाराष्ट्र सरकारचे लोक उपआयुक्त संजय  भाटिया,  शिवसेना नेते सुभाष देसाई, खासदार अनिल देसाई,  अरविंद सावंत, महासंघाचे सरचिटणीस प्रदीप मयेकर,मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड  जनरल एम्प्लॉईज युनियनचे सरचिटणीस सुधाकर अपराज,  मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे बोर्ड मेंबर दत्ता खेसे,  कल्पना देसाई, माजी नगरसेवक अनिल कोकीळ,  अरविंद भोसले,  शिवसेनेचे विभाग प्रमुख आशिष चेंबूरकर, मनोज जामसुतकर, उपविभाग प्रमुख विजय कामतेकर,  मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे सेवानिवृत्त अधिकारी   शेनॉय, पत्नी श्रद्धा घनकुटकर (पत्नी ),  प्रणाली घनकुटकर( मुलगी) , आदी मान्यवरांनी   मिलिंद घनकुटकर यांच्या सामाजिक व राजकीय कार्यांच्या आधारावर शुभेच्छापर भाषणे केली. शिवसेनेतील नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते नेहमी ८०  टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण यावर आधारित सामाजिक कार्य करतात.  सत्काराला उत्तर मिलिंद घनकु टकर यांनी दिले. तर प्रास्ताविक भाषण मुंबई पोर्ट प्राधिकरण स्थानिय लोकाधिकार समितीचे 

 माजी कार्याध्यक्ष व महासंघाचे पदाधिकारी नंदू राणे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीचे कार्याध्यक्ष बबन शिरोडकर व संदीप चेरफळे यांनी केले. 

याप्रसंगी मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे अधिकारी जी.एस. राठोड, गिरीश शिरसाट, सुनील देशमुख, रामगुडे, छड्डा,  शैलेश चव्हाण, प्रकाश दाते,  डॉ. चित्रा वाघ, बक्षी,  माजी नगरसेवक  ज्ञा. भी. गावडे, मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे पदाधिकारी विद्याधर राणे, विजय रणदिवे, विकास नलावडे, मारुती विश्वासराव, मनीष पाटील, प्रदीप नलावडे , संदीप चेरफळे,  ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनचे पदाधिकारी बबन मेटे बापू घाडीगावकर, शिवसेनेचे पदाधिकारी, शाखाप्रमुख, कार्यकर्ते, शिवसैनिक व विविध खात्यातील कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुंबई पोर्ट प्राधिकरण स्थानिय लोकाधिकार समितीच्या वतीने कार्यकर्त्यांनी  मिलिंद घनकुटकर यांना एक लाख एकशे अकरा रुपयाची भेट देण्यात आली. सदर रक्कम मिलिंद  घनकुटकर यांनी स्थानिय लोकाधिकार समितीला पुढील कार्यासाठी  पुन्हा परत केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मिलिंद घनकुटकर यांच्या सामाजिक व राजकीय आधारावर माहितीपट दाखविण्यात आला. स्नेहभोजनानंतर कार्यक्रम समाप्त झाला.

आपला

 मारुती विश्वासराव

टिप्पण्या