केंद्र सरकारच्या शेतकरी व कामगार धोरणाविरुद्ध भारतातील सर्व केंद्रीय कामगार संघटना व शेतकरी संघटनांनी आज देशभर औद्योगिक संप आणि ग्रामीण बंदची घोषणा केली होती. महाराष्ट्रात हिंद मजदुर सभेच्या आवाहनानुसार मुंबई बंदरात गोदी कामगारांचा वेतन करार त्वरित करा, कामगार विरोधी चार लेबर कोड मागे घ्या, नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करा, कंत्राटीकरण त्वरित थांबवा, लोकशाहीच्या मुलभूत तत्वांचे संरक्षण करा या मागण्यांसाठी जेवणाच्या सुट्टीत कामगार नेते सुधाकर अपराज यांच्या नेतृत्वाखाली कर्नाक बंदर येथे मुंबई बंदरातील मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन, ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियन, मुंबई पोर्ट ट्रस्ट वर्कर्स युनियन, मुंबई पोर्ट ट्रस्ट पेन्शनर्स असोसिएशन, फ्लोटीला वर्कर्स असोसिएशन, मुंबई पोर्ट प्राधिकरण स्थानीय लोकाधिकार समिती, मुंबई पोर्ट ट्रस्ट एस.सी. एस.टी. अँड ओबीसी वेल्फेअर असोसिएशन या सर्व कामगार संघटना एकत्रित येऊन तीव्र निदर्शने केली. याप्रसंगी युनियन व असोसिएशनचे पदाधिकारी सुधाकर अपराज, विद्याधर राणे,मिलिंद घनकुटकर, मिनास मेंडोसा, अशोक वडगावकर, बी.बी. आहेर, विजय कांबळे इत्यादी मान्यवरांची कामगारांना मार्गदर्शनपर भाषणे झाली. सभेचे सूत्रसंचालन मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे सेक्रेटरी व बोर्ड मेंबर दत्ता खेसे यांनी केले. सभेला युनियनचे पदाधिकारी विजय रणदिवे, अहमद काझी, निसार युनूस, संदीप कदम, मारुती विश्वासराव, संदीप चेरफळे, मनीष पाटील, विष्णू पोळ,प्रदीप नलावडे, मुंबई पोर्ट प्राधिकरण स्थानिय लोकाधिकार समितीचे पदाधिकारी बबन शिरोडकर, सूर्यकांत शिंदे, मुंबई पोर्ट ट्रस्ट पेन्शनर्स असोसिएशनचे पदाधिकारी डिंग्रेजा,गोवेकर, चिपळूणकर आदी कामगार, कार्यकर्ते व पेन्शनर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपला
मारुती विश्वासराव
प्रसिध्दीप्रमुख
मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन

addComments
टिप्पणी पोस्ट करा