समर्थ सांप्रदायाची भावना दुखावणा-या मुग्धा कर्णिक यांच्यावर कारवाई करा दासअच्या शिष्टमंडळाची पोलीस आयुक्तांकडे मागणी

 

नांदेड, दि.16 : हिंदू धर्मातील भगवान श्रीराम आणि थोर संत श्री रामदास स्वामी तसेच समर्थ संप्रदायाबद्दल अत्यंत प्रक्षोभक, भावना दुखावणारी आणि धर्मात तेढ निर्माण करणारी वक्तव्ये सोशल मीडियावर पसरवून श्रीमती मुग्धा कर्णिक यांनी भारतीय संविधान कोड 135 व 295 चे उल्लंघन केले आहे, याचा निषेध करत मुग्धा कर्णिक यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे दासबोध सखोल अभ्यासच्या शिष्टमंडळाने छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्तांकडे केली आहे.
समाजात काही समाजशरण वृत्तीने राहणा-या व्यक्ती सर्वसंगपरित्याग करतात. आयुष्यभर ब्रह्मचारी राहून समाज आणि राष्ट्राच्या उद्धारासाठी कार्य करतात. अशा व्यक्तिंचा प्रपंच, जीवनयापन चालवणे हे समाजाचे कर्तव्य आहे, याच भावनेतून समर्थ संप्रदाय भिक्षेवर चालतो.
या भिक्षेच्या दत्तसंप्रदाय, गोरक्षनाथांचीही व समर्थ संप्रदायाची 350 वर्षांची आहे.. अशा ह्या पवित्र कर्मावर मुंबई येथील श्रीमती मुग्धा कर्णिक यांनी फेसवर प्रक्षोभक पोस्टमुळे सांप्रदाय विघातक आणि प्रक्षोभक अशा तत्त्वांना चालना मिळेल, याला वेळीच ठेचले पाहिजे, अशा समाजविघातक व्यक्तिंवर वेळीच कारवाई करावी, अशी मागणी दासबोध सखोल अभ्यासच्या शिष्टमंडळाने छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस आयुक्तांकडे केली आहे. 
शिष्टमंडळाने दिलेल्या या निवेदनावर संचालक डाॅ. विजय लाड, एड. रवींद्र भामरे, देवीदास पिसोळकर, पद्माकर कुलकर्णी, अविनाश जहागिरदार, सौ.मानसी याडकीकर, सौ.वंदना पिसोळकर, किशोर देशमुख, जगदीश चोरगे, विकास साळुंखे, बालाजी लाड, दिलीप लाड, एड. शंकर जाधव आदीच्या स्वाक्ष-या आहेत. 
टिप्पण्या