किनवट येथील काँग्रेस पक्षाला खिंडार.

 

किनवट येथील माजी नगरसेवक इमरान खान इसा खा यांचा सह अनेकांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश-जिल्हाध्यक्ष इजि. विश्वंभर पवार यांनी सर्वांचे स्वागत केले.        भोकर- 15 फेब्रुवारी रोजी भोकर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संपर्क कार्यालय मध्ये किनवट येथील माजी नगरसेवक इमरान खान इसा खान यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे कार्य पाहून नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येण्यासाठी कार्यकर्त्याची झुंबर लागली आहे. गेल्या दोन-तीन महिन्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष.इजि. इंजिनीयर विशंभर पवार यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षांमध्ये प्रवेश केलेला आहे. आज 15 फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष हि शाखा सरदार खा व राष्ट्रवादी काँग्रेसचे किनवट माहूर विधानसभा अध्यक्ष वैजनाथ कर पुडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते भोकर येथे राष्ट्रवादीचा संपर्क कार्यालयामध्ये येऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी उत्तरचे जिल्हाध्यक्ष इंजिनीयर विशंभर पवार यांनी सर्वांचे स्वागत केले. या प्रसंगी सय्यद अजीमदिन रहेमान. मजर चाऊस. बाळू राठोड. जाकीर हुसेन. जावेद खान. अबू चाऊस. शेख असिफ. मोहम्मद इलीयास. यांच्यासह अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी किनवट येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष हबीब चव्हाण. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्राचे सचिव आनंद पाटील सिंधीकर,ओबीसी चे जिल्हाध्यक्ष आनंद डांगे. शंकर गाडे जिल्हाध्यक्ष सुरक्षा दल. रवी गेंटेवार।अहमदभाई करखेलीकर जिल्हा महासचिव , राजेश्वर देशमुख तालुका अध्यक्ष भोकर, विजय पाटील सोळंके, रवी गेंटेवार, सिद्धेश्वर पाटील चिंचाळकर, अनिल डोईफोडे, दत्ता बोईनवाड, निलेश खांडरे, कृष्णा ठाकूर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते, 
टिप्पण्या