अशोकराव चव्हाण यांचा आमदारकीचा राजीनामा राज्यसभेवर जाण्याची दाट शक्यता

 महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मुंबई : लोकसभेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आलेली असताना काँग्रेस पक्षाला एकामागोमाग एक मोठे धक्के बसत आ...


 महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री
मुंबई : लोकसभेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आलेली असताना काँग्रेस पक्षाला एकामागोमाग एक मोठे धक्के बसत आहेत. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे बडे नेते मिलिंद देवरा, त्यानंतर गेल्या आठवड्यात ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसला रामराम केला. हे धक्के अजून पचलेले नसतानाच आज माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी दिली.

माजी आमदार अमर राजूरकर यांच्यासह नांदेड जिल्हयातील मोहन हंबर्डे (नांदेड दक्षिण), जितेश अंतापूरकर (देगलूर) माधवराव जवळगावकर (हदगाव) हे आमदार अशोक चव्हाण यांच्यासोबत भाजपमध्ये जाणार आहेत. विश्वजीत कदम, अस्लम शेख, अमीन पटेल, हिरामण खोसकर, सुलभा खोडक, अमित झनक हे राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. त्यात माजी आमदार हनमंत बेटमोगरेकर आणि रमेश बागवे हे अशोक चव्हाणांसोबत असल्याची माहिती आहे.

अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना अशोक चव्हाण यांनी पत्र लिहिले आहे. या पत्राच्या माध्यमातून त्यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले आहे.

यामुळे काँग्रेसला मोठे खिंडार पडले असून राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली. अशोक चव्हाण हे आता भाजपच्या वाटेवर असून लवकरच त्यांचा पक्षप्रवेश होईल अशी अटकळ बांधली जात आहे. भाजपतर्फे त्यांना राज्यसभेवर पाठवले जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

नार्वेकरांच्या भेटीनंतर अशोक चव्हाण नॉट रिचेबल
आज सकाळी अशोक चव्हाण यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. आणि त्यानंतर ते नॉट रिचेबल झाले. नार्वेकर-चव्हाण यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चेला उधाण आले. मात्र ना अशोक चव्हाण ना भाजपचे इतर नेते, कोणीही यावर स्पष्ट भाष्य केले नाही. त्यामुळे अशोक चव्हाण यांचा नेमका मनसुबा काय यावर विविध तर्क लावण्यात येत होते. त्यानंतर दुपारी अशोक चव्हाण यांनी थेट काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यामुळे एकच गदारोळ माजला. महाराष्ट्र काँग्रेसमधील या मोठ्या भूकंपानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे तातडीने दिल्लीला रवाना झाले.

अशोक चव्हाण भाजपकडून राज्यसभेवर जाणार!
राजीनाम्यानंतर अशोक चव्हाण यांचे पुढचे पाऊल काय असेल याबद्दल विविध अंदाज व्यक्त होत आहेत. ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असून भाजपतर्फे त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात येईल अशी चर्चा सुरू आहे. रविवारी भाजपची राज्यसभेची यादी जाहीर झाली होती. उत्तर प्रदेशापासून ते पश्चिम बंगालपर्यंतच्या उमेदवारांची नावे त्यात घोषित करण्यात आली. पण महाराष्ट्रातील नेत्यांची नावे जाहीर करण्यात आली नव्हती. चव्हाण हे भाजपमध्ये येणार असल्यामुळेच भाजपने महाराष्ट्रातील यादी जाहीर केली नसल्याची आता चर्चा आहे. आज संध्याकाळपर्यंत चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश झाल्यानंतरच भाजपकडून महाराष्ट्रातील राज्यसभेच्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार असे वृत्त आहे.

नांदेड जिल्ह्यातील नायगावचे माजी आमदार वसंतराव चव्हाण हे त्यांच्या कुटुंबातील लग्न सोहळ्यामुळे नांदेडमध्येच आहेत. परंतु त्यांची भूमिका देखील अशोक चव्हाण यांच्यासोबतच राहील, असे बोलले जात आहे. जालना येथील आमदार कैलास गोरंट्याल हे देखील अशोक चव्हाण यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे ते देखील अशोक चव्हाण यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश करतील असे राजकीय संकेत आहेत.

नांदेडच्या बंगल्यावर शुकशुकाट
नांदेड जिल्हा अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. आता त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या नांदेड येथील त्यांच्या निवासस्थानी कुठल्याही हालचाली दिसून येत नाहीत. कार्यकर्ते किंवा पदाधिकारी यांना देखील अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पदाचा राजीनामा दिल्याची माहिती नाही. त्यांच्या नांदेड येथील निवासस्थानी शुकशुकाट पहायला मिळत आहे.
खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर
अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चांवर प्रतिक्रिया

• चर्चा मी देखील ऐकत आहे, अशोक चव्हाण विधान भवनात राजीनामा देण्यासाठी आले होते म्हणजे नक्कीच ते भाजपामध्ये प्रवेश करणार असे मला वाटते
• आता पर्यंत जे भाजपामध्ये पक्षप्रवेश झाले तेव्हा त्यांचे स्वागत आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे
• आम्ही एकमेकांचे राजकीय विरोधक आहोत, भाजपा नांदेडमध्ये अगोदरपासूनच बळकट आहे अशोक चव्हाण यांच्या भाजपामध्ये येण्याने आणखी बळकटी वाढेल
 .


COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group