*
सायन्स कॉलेज नांदेड च्या रा से यो द्वारा आयोजित युवकांचा ध्यास ग्राम शहर विकास विशेष वार्षिक शिबिर वडेपुरी ता. लोहा, जिल्हा नांदेड येथील अन्नपूर्णा माता मंदिरच्या परिसरात दिनांक 10 फेब्रुवारी 2024 रोजी ठीक 9.30 वाजता आरोग्य तपासणी शिबीरात वडेपुरी येथील गावकऱ्यांचा व रासेयो च्या स्वयंसेवकांचा सहभाग व त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये डॉ संजय महाजन व त्यांच्या टीम चे या शिबिरात खूप मोठे योगदान होते. तसेच विवेकानंद चित्र प्रदर्शनी लावून विवेकानंद यांचे जीवन चरित्र व कार्य याची सखोल माहिती विद्यार्थ्यांना दिली. तसेच विवेकानंद वरील पुस्तकांचे प्रदर्शनी लावण्यात आली. पुढील सत्रात डॉ डी डी पवार यांच्या अध्यक्षतेत कार्यक्रम प्रारंभ झाला. डॉ किरण शिल्लेवार यांनी मत्स्य संवर्धन, डॉ ओमप्रकाश दरक यांनी अवयव दान जनजागृती आणि श्री माधव सुगावकर यांनी एड्स व रक्तदान जनजागृती केली. श्री आनंद सुरशे यांनी राष्ट्र घडविण्यात युवकांची भूमिका या विषयावर मार्गदर्शन केले व गीत गायन केले. प्राध्यापक कार्तिक जाधव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रो डॉ सौ अरुणा राजेंद्र शुक्ला यांनी कार्यक्रमाचे संयोजन व आभार प्रदर्शन केले.

addComments
टिप्पणी पोस्ट करा