माय-बापच आपली काशी, त्याने न जावे तिर्थाशी.' माझ्यात श्वास असेपर्यंत मी समाजकार्य चालूच ठेवणार.....

कंधार : 

 आईवडिलांच्या चरणातच काशी आणि चार धाम आहेत. परंतु आज समाजात जन्मदात्या आईवडिलांविषयी प्रेम लुप्त होत चालले आहे. मुलांनाच लग्न झाल्यावर आईवडिलाचे ओझे वाटू लागले आहे. परंतु तुम्ही जगभरातील संपत्ती कमवा, तिचे महत्त्व आई-वडिलांसमोर नगण्य आहे. ज्या घरात आई-वडील नावाचा सुगंध दरवळत असतो त्याच घरात भगवंतदेखील सहवास करीत असतो. माय-बापच आपली काशी, त्याने न जावे तिर्थाशी.' जीवनात सुख व आनंदासाठी दुसऱ्यांना सुखी व आनंदी करा तरच जीवनात तुम्ही सुखी व आनंदी व्हाल. त्यासाठी गरिबांची सेवा करा कारण गरिबांची सेवा हीच ईश्वर सेवा असल्याचे प्रतिपादन प्रा. डॉ. पुरुषोत्तम धोंडगे यांनी केले
 डॉ. भाई केशवराव धोंडगे यांनी गोरगरीब जनतेसाठी आयुष्यभर कार्य केले. आपलं आयुष्य झिजवले. ते आज आपल्यात नाहीत पण त्यांनी केलेले समाजकार्य मी पुढे माझ्यात श्वास असेपर्यंत मी समाजकार्य चालूच ठेवण्याचा संकल्प केला आहे 
श्री शिवाजी हायस्कूल कंधार येथे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी सुरू करण्यात आलेल्या भाऊचा डब्बा या उपक्रमाने १ हजार दिवसाचा पल्ला ओलांडला व त्यांनी केलेल्या कार्याबद्दल नुकताच त्यांना पुरस्कार मिळाला आहे. शाळेतर्फे ठेवण्यात आलेल्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी आदी मान्यवर ऊपस्थित होते.     पुढे बोलतांना प्रा. धोंडगे पुढे म्हणाले की, दिवंगत भाई डॉ. केशवराव धोंडगे यांनी गोरगरीब जनतेसाठी आयुष्यभर कार्य केले. नाहिरेवाल्यांसाठी आपले संपूर्ण आयुष्य झिजविले. त्यांना न्याय मिळवून दिला. मन्याड खोऱ्यात शैक्षणिक दालने उघडून तळागाळातील लोकांपर्यंत शिक्षणाची गंगा नेली. उपेक्षित, शोषित समाज त्यांचा केंद्रबिंदू होता. त्यांचे विचार आजच्या काळाला दिशा देणारे आहेत. त्यांनी कधीच तत्वांशी तडजोड केली नाही. त्यांचा वसा पुढे चालविण्याचा आम्ही प्रयत्न करीत असून रुग्ण सेवा त्याचाच एक भाग असल्याचे प्रा. धोंडगे यांनी सांगितले. त्यांनी आपल्या हयातीत गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी व हितासाठी अहोरात्र प्रयत्न करुन त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम केले होते. त्यांचाच वारसा पुढे चालू ठेवण्याचे कार्य त्यांचे सुपुत्र पुरुषोत्तम धोंडगे करीत असून त्यांनी गोरगरीब जनतेसाठी "भाऊचा डब्बा" या नावाने अन्न दानाचा उपक्रम चालू केला आहे. या उपक्रमाने नुकताच १ हजार दिवसाचा पल्ला गाठला असून या माध्यमातून प्रा. धोंडगे यांनी समाजापुढे आदर्श ठेवला आहे. 

माझ्यात श्वास असेपर्यंत मी "भाऊचा डबा" चालूच ठेवणार.
डॉ. भाई केशवराव धोंडगे यांनी गोरगरीब जनतेसाठी आयुष्यभर कार्य केले. आपलं आयुष्य झिजवले. ते आज आपल्यात नाहीत पण त्यांनी केलेले समाजकार्य मी पुढे चालू ठेवण्याचा संकल्प केला आहे.
 त्याचाच भाग म्हणून मी गरजूंना "भाऊचा डब्बा" हा उपक्रम चालू केला आहे. माझ्यात श्वास असेपर्यंत मी "भाऊचा डब्बा" चालू ठेवून गोरगरीब, सामान्य  जनतेची सेवा करणार आहे. "भाऊचा डब्बा" या उपक्रमास १ हजार दिवस पूर्ण झाल्याबद्दल श्री शिवाजी हायस्कूलच्या वतीने माझा सन्मान करण्यात आला त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. - प्रा. डॉ. पुरुषोत्तम धोंडगे.


टिप्पण्या