मुदखेड येथे अपघातात एक महिला जागीच ठार

 

मुदखेड (ता. प्र.)

      16 फेब्रुवारी रोजी दुपारी 1. 15 वाजताच्या  दरम्यान आपल्या शेतातून काम करून मुदखेड येथे घरी परत येत असताना महात्मा बसवेश्वर चौक ते सीता नदी रस्त्या वर कारणे मागून धडक दिल्यामुळे कुंभार गल्ली येथील एक महिला जागीच ठार झाली तर एक महिला गंभीर जखमी झाली असून पुढील वैद्यकीय उपचारासाठी त्यांना नांदेड येथे पाठविण्यात आले आहे .
अन्य एका महिलेवर मुदखेडच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती प्राप्त होताच  सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब कांबळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बालाजी गीते ,पो.हे. का .चंद्रशेखर मुंडे आदींनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्तांना योग्य ती मदत केली.
टिप्पण्या