राष्ट्रसेवा दल व परिवर्तन संस्थेतर्फे आंतरशालेय चित्रकला स्पर्धा संपन्न*

प्रा.मधु दंडवते आणि साथी लक्ष्मण जाधव यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राष्ट्र सेवा दल आणि परिवर्तन मुंबई यांच्यावतीने आंतरशालेय चित्रकला स्...


प्रा.मधु दंडवते आणि साथी लक्ष्मण जाधव यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राष्ट्र सेवा दल आणि परिवर्तन मुंबई यांच्यावतीने आंतरशालेय चित्रकला स्पर्धा १७ डिसेंबर २०२३ रोजी परेल येथील नरेपार्क मैदानावर संपन्न झाल्या..या स्पर्धेची सुरवात साने गुरुजी यांच्या खरा तो एकची धर्म,जगाला प्रेम अर्पावे या गीताने करण्यात आली.यावेळी प्रा.मधु दंडवते यांच्या तसबिरीस अनिल गंगर तर साथी लक्ष्मण जाधव यांच्या तसबिरीस जवाहर नागोरी यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला या स्पर्धेला मुंबईतील ६५ शाळांतील जवळपास अडीच हजाराच्या वर स्पर्धकांनी भाग घेतला होता.या सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आली.या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ स्पर्धा संपल्यावर दीड तासांनी करण्यात आला.यात ६० स्पर्धकांना गौरविण्यात आले.या विजयी स्पर्धकाना प्रमाणपत्र,सन्मानचिन्ह आणि त्यांच चित्र फ्रेम करून देण्यात आले.या स्पर्धेचे विजयी स्पर्धक निवडण्यासाठी निलेश घागरे यांच्या नेतृत्वाखाली २० परीक्षकांनी आपले योगदान दिले होते.या स्पर्धेला भारतीय प्रशासकीय अधिकारी समीर वानखेडे, मुंबई पोर्ट ट्रस्ट च्या ट्रस्टी कल्पना देसाई,अपना बाजारचे अध्यक्ष श्रीपाद फाटक,उपाध्यक्ष अनिल गंगर,,कार्यकारी संचालक विश्वनाथ मलुष्टे,संतोष सरफरे,संचालक शरद फाटक,अनिल ठाकूर,अपना बँकेचे अध्यक्ष अविनाश सरफरे,संचालक महेश मलुष्टे,लालबागचा राजा चे सरचिटणीस सुधीर साळवी, माजी नगरसेवक सचिन पडवळ,शाखाप्रमुख मिनार नाठाळकर,बेस्ट कामगारांचे नेते सुहास नलावडे, म्यून्सिपल कामगारांचे नेते रमाकांत बने, गोदी कामगारांचे नेते मारुती विश्वासराव,के. इ एम च्या नेप्रॉलोजी डिपार्टमेंटचे प्रमुख डॉ तुकाराम जमाले,साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष प्रमोद निगुदकर,ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते जवाहर नागोरी,सुहास कोते आदी उपस्थित होते.ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिवर्तनाच्या अध्यक्षा सारिका साळुंके,सरचिटणीस केतन कदम, जगदीश नलावडे, प्रमुख कार्यकर्ते राजेश मोरे,राज तोरसकर,वैशाली साळुंखे,स्वप्नील कदम,अविनाश बने,प्रवीण सुखी,हेमंत बिडवे यांनी विशेष प्रयत्न केले.या स्पर्धेचे सूत्र संचालन सुधीर वाणी यांनी केले.त्यांनी आपल्या खुमासदार शैलीत जवळपास दीडशे कार्यकर्त्यांचा जोश कायम ठेवला.

आपला

मारुती विश्वासराव

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group