परेल येथील शिरोडकर हायस्कूल विद्यार्थ्यांचा राहुटी सोहळा*


परेल येथील शिरोडकर हायस्कूलचे संस्थापक, डॉ रामचंद्र 

काशिनाथ शिरोडकर यांचा १८ डिसेंबर हा स्मृती दिन. दरवर्षी या दिवसापासून शाळेचे सतत तीन दिवस कार्यक्रम सुरू असतात. त्यातील एक कार्यक्रम म्हणजे १९७२ च्या बॅचचा 'राहुटी सोहळा ' असतो. प्रत्येक वर्गाला राज्य दिले जाते. त्यानुसार राहुटीचि

सजावट करायचि , महाराष्ट्राची परंपरा असलेला वेष परिधान करायचा आणी संपूर्ण दिवस नरेपार्क मैदानात मजा मस्तीत घालवायचा. त्यामुळे सर्व राज्यांचि भौगोलिक व सांस्कृतिक माहिती विद्यार्थ्यांना कळते. अभिमानाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रात हा कार्यक्रम करणारी एकमेव शाळा म्हणजे शिरोडकर शाळा. यावर्षी राहुटीचा विषय होता, छत्रपती शिवाजी महाराजांचा 

३५० वा राज्याभिषेक. १८ डिसेंबर २०२३ रोजी सकाळ पासून मैदानात सर्वजण जमले. सर्वजण भगवे फेटे घालून ,

पूर्ण राहुटी शिवरायमय झाली होती. महाराजांचे गडावरील फोटो, राज्याभिषेकाचे फोटो महाराजां चा भव्य पुतळा ह्या सर्वानी राहुटी सजली होती. शुभदा भांगले, नामदेव गोसावी, प्रदीप राज, राजन बागवे, यांनी खूप मेहेनत घेतली. चहा नाश्त्या नंतर स्वराज्याची 

गाणी म्हणुन महाराजांना आदरांजली वाहिली, विशेष  

पिटीचे सर श्री. सुरेश सावंत (वय ८७ वर्षे) आवर्जून कार्यक्रमाच्या शेवटापर्यंत हजर होते. शाळेचे माजी विद्यार्थी, १९७२ च्या बॅचचे,मा. श्री. अरविंद सावंत उपस्थित होते. शाळेच्या वेगवेगळ्या उपक्रमाच्या आठवणीना त्यांनी जागे केले. 

संध्याकाळी एक सांस्कृतिक कार्यक्रम करायचा असतो.

कमलाकर सुर्वे यांनी स्टेजवर 

'दहा दिशांच्या हृदयामधून अरुणोदय झाला 'ह्या शिवाजी राज्याभिषेकाच्या गाण्याच्या वेळेत महाराजांचे चित्र साकार केले. आजूबाजूला असलेले तुतारी, पडघम वादक मावळे, आणि शिवाजी महाराजांचा जयघोष यांनी वातावरण 

दुमदुमून गेले होते. देवदत्त नागपुरे यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. संध्याकाळी सात वाजता कार्यक्रमाची सांगता झाली.

आपला 

मारुती विश्वासराव

टिप्पण्या