देश फक्त मा.पंतप्रधान मोदीजिंच्या पाठीशी आहे..!लोकांचा विकासावर विश्वास कायम*- रामदास पाटील सुमठाणकर*

हिंगोली :- नुकत्याच जाहीर झालेल्या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला एकहाती सत्ता मिळाली याचं सर्व श्रेय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं ...


हिंगोली :- नुकत्याच जाहीर झालेल्या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला एकहाती सत्ता मिळाली याचं सर्व श्रेय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं म्हणावं लागेल.

देशात मागील दहा वर्षात झालेल्या अनेक लोकाभिमुख योजनेतून मोदी सरकारने जनतेला आपलंस केल्यानं आणि अनेक कल्याणकारी योजनांचा धडाका सुरू असल्याने जनतेचा विश्र्वास कमावण्यात भाजप यशस्वी झाले आहे.हा विजय म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींप्रती लोकभावनांचे प्रतिबिंब असून आजचा विजय हा २०२४ च्या लोकसभा निवडणुक विजयाची ही नांदी ठरणारा आहे.

2014 साली देशात मोदीजींची सत्ता आल्यानंतर अनेक महत्वाच्या योजनांच्या माध्यमातून लोकांच्या मनात घर केले. त्याच फळं आज अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत विजयाच्या रूपानं दिसून येत आहे.

आजचे विजय हे गरीब आणि शेतकऱ्यासाठी काम केल्याचं फलित आहे.आज मतदारांचा विश्र्वास कायम राखत भाजपाने मुसंडी मारलीय.आगामी काळात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला एकहाती सत्ता मिळणारं यांची जाणीव करून देणारा हा निकाल आहे.

गरीब आणि मध्यमवर्गीय जनतेसाठी केलेल्या कामाचं महत्त्व लक्षात घेऊन जनतेनं भाजपाच्या बाजूने कौल दिला. लोकांच्या मनात मोदी जी अजून कायम असून त्यांचा करिश्मा अजून कायम असल्याचे या निमित्ताने दिसून येत आहे.

पुढे पाटील म्हणतात,

विधानसभा निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर लढवण्यात आली हाच कल लोकसभा निवडणुकीतही कायम राहील असा विश्वास वाटतो.

देशातील जनतेने या निवडणुकांमधून आपला मूड दाखवून दिला आहे. विशेषतः राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यात भाजपला मोठे यश मिळाले आहे.मोदींच्या नेतृत्त्वात आमच्या सरकारने जी रणनिती ठरवली होती,त्यास जनतेने एकप्रकारे समर्थन देत पाठिंबा दिला आहे.

देशाला महासत्ता बनविण्यासाठी आणखी वेगाने विकास करण्यासाठी मोदींचे हात बळकट करण्यासाठी जनता पाठीशी आहे.याची जाणीव या निमित्ताने होत आहे.जनतेचा हा पाठिंबा देशाच्या भविष्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल.आणि देशाला एक बलशाली राष्ट्र बनवेल.

आजचा विजय हा जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या दूरदृष्टीवर दाखवलेल्या विश्वासाचा विजय आहे असे रामदास पाटील म्हणाले.

तसेच आगामी 2024 ला हिंगोली लोकसभा भाजपा विक्रमी मताने जिंकणार असेही ते म्हणाले.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group